पनवेल,दि.७: नदीचे कुणीच ऐकना, शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतली
अशा उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करत हास्य फुलवणारे लागणारे महाराष्ट्राचे दिग्गज कवि अशोक नायगांवकर यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आपल्या कवितेच्या माध्यमातून हास्य फवारे उडवून दिले. निमित्त होते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महागनगरपालिकेच्यावतीने “जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कवि प्रशांत मोरे, कवि डॉ. विजय देशमुख आणि कवयित्री डॉ. स्मिता दातार, मृणाल केळकर, महानंदा मोहिते यांनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने उपस्थित होते.
यावेळी अशोक नायगावकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर कार्यक्षमतेची प्रशंसा करत ‘मिळवती’, भाकर, शाकाहार अशा अनेक कविता सादर करून नाट्यगृहात सर्वत्र हाशा पसरवला.
यावेळी कवी प्रशांत मोरे यांनी आपल्या खड्या आवाजात ‘ बाप तुझा राबणारा रानोमाळ फुल, हिरवा जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल, सुखदुखाच्या छेडी रोज लाटा गं ,पायी फुफाटा फुफाटा…’ही त्यांची फुफाटा कवी सादर केली तसेच त्यांची प्रसिध्द कविता मैना व परीस परीस सादर केली.
डॉ. विजय देशमुख यांनी आपली मराठीचा बाणा,महिला दिन, झुकेगा नही साला, जात अशा विविध कवितांच्या माध्यमातून समाजामधील वास्तवांवर प्रकाश झोत टाकला.
कवयित्री स्मिता दातार यांनी बाई आणि शाई, मी 16 ऑगस्ट बोलतोय, कविता सादर केल्या .तसेच कवियित्री मृणाल केळकर यांनी गेय कविता सादर केल्या. तसेच कवियित्री महानंदा मोहिते यांनी आपल्या अंगण कवितेने सर्वांना मंत्रमुग्ध केले तसेच यावेळी त्यांनी आपल्या बाई, महाराज कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कैलास गावडे यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांनी केले . यावेळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पनवेल शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.