पनवेल दि.७.:- महानगरपालिकेच्या अभिनव उपक्रमांतर्गत स्वांतत्र्यवीरांचे उत्तराधिकारी सीमा परांजपे यांना महापालिकेच्यावतीने नुकतेच त्यांची ध्वजारोहण प्रसंगीची फोटोफ्रेम सस्नेह भेट व आभार पत्र त्यांच्या घरी जाऊन सन्मानाने सुपूर्द करण्यात आले.
पनवेल शहरातील हुतात्मा स्मारक येथे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य सेनानींच्या वारसदारांच्या शुभहस्ते ध्वजवंदन, ध्वजारोहण केले जाते. त्यानुसार यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी स्वांतत्र्यवीरांचे उत्तराधिकारी सीमा परांजपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. याप्रसंगी पनवेल महापालिकेतर्फे स्वातंत्र्य सेनानींच्या वारसदारांचा यथोचित सन्मान करण्यात यावा, अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यास अनुसरून आयुक्त मंगेश चितळे यांच्या कल्पनेनुसार महापालिकेने एक अभिनव उपक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे.
या अभिनव उपक्रमांतर्गत स्वांतत्र्यवीरांचे उत्तराधिकारी सीमा परांजपे यांना महापालिकेच्यावतीने नुकतेच त्यांची ध्वजारोहण प्रसंगीची फोटोफ्रेम सस्नेह भेट व आभार पत्र त्यांच्या घरी जाऊन सन्मानाने सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपायुक्त प्रसेनजित कारलेकर,सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने , प्रभारी अधिक्षक रोशन माळी, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!