माथेरान दि.७: (मुकुंद रांजणे) दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी येथील मुकद्दर क्रिकेट संघाने तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेटचे सामने आयोजित केले होते.यशस्वीपणे या संघाने सातव्या वर्षात पदार्पण करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील होतकरू आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ज्यांच्यात क्षमता आहे अशा दिग्गजांना “संघर्षाची साथ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.माथेरान मध्ये खऱ्या अर्थाने जिद्द, चिकाटी आणि प्रचंड अंगमेहनत घेऊन यशाचे शिखर गाठण्यासाठी मागील वीस वर्षांत स्वतःच्या व्यवसायात केलेल्या यशस्वी वाटचालीमुळे शिवाजी शांताराम शिंदे यांनी आपल्या भाजीपाला व्यवसाया सोबतच सुरुवातीला लोजिंग आणि पुढे एका हॉटेलचा व्यवसाय करून आपल्या कष्टाचे चीज केले असून वडिलांनी सुरू केलेल्या फळ भाजीपाला या छोट्याशा व्यवसायाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.
परमेश्वराने मनुष्याला अनमोल जीवन अगदी सहज प्राप्त करून दिलेले असताना त्या जीवनाचे सार्थक करणे आपले परमकर्तव्य असते.जीवनात अनेक चढउतार येतच असतात.पण न डगमगता धीराने आणि चिकाटीने संघर्षमय वाटचालीत येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करून आपले मनाशी योजिलेले ध्येय, स्वप्न साकार करण्यासाठी खडतर आव्हाने पेलून स्वतःच्या स्वप्नवत जीवनाचे सार्थक करण्यासाठी आलेल्या कटू प्रसंगांना हसतमुखाने सामोरे जाण्याची खऱ्या अर्थाने ज्यांच्यात ऊर्जा असते अशाच व्यक्ती आपल्या सर्वांच्या मनात घर करून खरोखरच कौतुकास पात्र ठरतात. माथेरान मधील क्वचितच काही अशा व्यक्ती संघर्षमय जीवनात यशस्वी झालेल्या पहावयास मिळत आहेत. की ज्यांनी लहानपणापासूनच गरिबीच्या खाईत दारिद्र्याचे,वेदनांचे चटके सहन केलेले आहेत. काहींनी तर शालेय जीवनापासूनच कष्टदायी कामे करून शिक्षण घेत असताना आपल्या कुटुंबाला आधार सुद्धा दिलेला आहे. त्यावेळी मनाशी खूनगाठ बांधून हेही दिवस जातील या बिरूदावलीला अभिप्रेत अंग मेहनत करून जे काही वैभव आज प्राप्त केलेले आहे त्याला त्यांच्या घामाचा सुगंध दरवळताना दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माजी नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शांताराम शिंदे हे होय.
शिवाजी शिंदे यांनी लहानपणापासूनच वडिलांनी घेतलेले कष्ट मेहनत अगदी जवळून पाहिली होती त्यानुसार त्यांनी आपल्या शिक्षणाबरोबरच वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावला होता खूपच छोटासा फळांचा व्यवसाय करणारे त्यांचे वडील यांच्या हाताला हात देऊन पुढे भाजीपाला व्यवसायात आपले पाय घट्ट रोवून मागे वळून न पाहता हळूहळू या व्यवसायात जम बसवून मिळणाऱ्या जमापुंजीचा सदुपयोग करून छोट्या छोट्या वास्तु उभारल्या स्वतःची लॉजिंग त्याचप्रमाणे रेस्टॉरंट,सुंदर असे गोकुळ विला हे हॉटेल आणि नुकताच गेम झोन अशी व्यवसायाची साधने उपलब्ध केली आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी स्वखर्चाने जो काही डोलारा उभा केला आहे तो अवर्णनिय आहे युवा पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संघर्षमय जीवनात प्रत्येकाने अशाप्रकारे कष्ट अंग मेहनत केली तर सर्वांना सहज प्राप्त होऊ शकते एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचे सुख शांती समाधान प्राप्त होऊन सुद्धा आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे.
माथेरान मधील मुकद्दर क्रिकेट संघाने ज्या विभूतींची नावे संघर्ष योद्धा म्हणून जाहीर केली होती त्यामध्ये शिवाजी शिंदे यांची या संघाने संघर्ष योद्धा या पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल मुकद्दर क्रिकेट संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!