पनवेल दि.८: भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत कामोठे येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचा विजेतेपद डिस्टन्स इलेव्हन या संघाने पटकावले. उपविजेते केवायसी इलेव्हन, तृतीय क्रमांक आयांश इलेव्हन तर चतुर्थ क्रमांक संघ इलेव्हन संघाने पटकाविला. विजेत्या संघाला १५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला १० हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये व चषक तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाला ०३ हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शनिवारी कामोठे मधील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर पुरुष खुला गटाची व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर व नमो चषकचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेचे उद्घाटन कामोठे भाजपचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी कामोठे पोस्ट ऑफिस अधिकारी बबन भोईर, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, विकास घरत, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व स्पर्धा समन्वयक मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, अक्षय सिंग, जय पावणेकर,भीमराव पोवार, भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा विद्या तामखेडे, साधना आचार्य, अनुसूचित मोर्चाचे कामोठे अध्यक्ष मयुर मोहिते,अनुसूचित महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली खरटमोल, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, कळंबोली युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक, देवांशू प्रबाळे,आयुष किंद्रे, यश भोईर, कामोठे युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रवीण कोरडे, उपाध्यक्ष सागर ठाकरे, चिटणीस किरण जाधव, चिटणीस विकी टेकवडे, कोषाध्यक्ष अमोल बिनवडे, अमित गोडसे, सुयोग वाफारे, प्रथमेश सातपुते, निलेश सरगर, आकाश शिंदे, शंकर कारंडे, सुयश कांबळे, मयुर शिंदे, प्राणिल पवार, आकाश सिंग, आयुष कातोरे, नयन चौगुले, पार्थ लाले, रितेश कानोजिया,ओम पाटील, करन जगदाळे, प्रज्वल यांच्यासह इतर कार्यकर्ते व क्रीडा रसिक उपस्थित होते.