पनवेवल दि.९: नमो चषक अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रस्सीखेच स्पर्धेत पुरुषांच्या गटात एलआरटी कामोठे संघाने तर महिलांच्या गटात एसएमएनएस संघाने प्रथम पटकाविला. पुरुषांच्या गटात द्वितीय क्रमांक जॅग्वार कामोठे तर तृतीय क्रमांक मोरया फिटनेस कळंबोलीने महिलांच्या गटात एलआरटी रायडर्स कामोठे तर तृतीय क्रमांक साई स्पोर्टस संघाने मिळवला.
उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत कामोठे मधील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर पुरुष व महिला गटाची रस्सीखेच स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नमो चषकचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्पर्धेचे उद्घाटन कामोठे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, ज्येष्ठ नेत्या सुहासिनी शिवणेकर, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, हेमलता गोवारी, अरुणा भगत, जिल्हा चिटणीस विद्या तामखडे, प्रदीप भगत, रवी गोवारी, भाऊ भगत, लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल कामोठेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, जय पावणेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, मनोहर शिंगाडे, सुहास शिवडकर, यमुना प्रकाशन, कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, उपाध्यक्षा साधना आचार्य, फातिमा आलम, मनिषा वणवे, वर्षा शेलार, सुरेखा लांडे, वैशाली घोलप, वैशाली साबळे, अरुणा शिंदे, जया गायकवाड, स्मिता यादव, विद्या शेलार, मयुरी जाधव, हर्षदा तुपे, सोनाली खरटमोल, दिपाली पवार, सारिका तामखडे, वनिता म पाटील, ललिता दोपलपुडी, देवांशू प्रबाळे, आयुष किंद्रे, यश भोईर, गौरव नाईक, अक्षय सिंग, कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, प्रवीण कोरडे, सागर ठाकरे, राहुल बुधे, आदित्य भगत, किरण जाधव, विकी टेकवडे, अमोल बिनवडे, अमित गोडसे, सुयोग वाफारे, प्रथमेश सातपुते, निलेश सरगर, आकाश शिंदे, शंकर कारंडे, सुयश कांबळे, मयुर शिंदे, प्राणिल पवार, आकाश सिंग, आयुष कातोरे, नयन चौगुले, पार्थ लाले, प्रज्वल, रितेश कानोजिया,ओम पाटील, करन जगदाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
रस्सीखेच खेळ टग ऑफ वॉर या नावाने प्रसिद्ध आणि एक पारंपरिक खेळ आहे, जो ताकद, सहकार्य आणि रणनीती यांचा समतोल साधतो. या खेळात दोन संघ एकाच रस्सीच्या विरुद्ध बाजूंना उभे राहून एकमेकांना खेचण्याचा प्रयत्न करतात. जो संघ प्रतिस्पर्धी संघाला निश्चित मर्यादेपलीकडे खेचतो, तो विजेता ठरतो. हा खेळ हात, पाय आणि शरीराच्या स्नायूंना बळकट करतो. टीमवर्क आणि समन्वय वाढवण्याबरोबरच मानसिक तग धरण्याची क्षमता वाढवतो. हा खेळ खेळण्यास मजेदार असून शरीर तंदुरुस्त ठेवणारा असल्याने हा खेळ शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भाग तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळला जातो. त्यामुळे या खेळाचे महत्त्व लक्षात घेऊन या खेळाच्या प्रचारासाठी आणि खेळाडूंच्या विकासासाठी या स्पर्धेचे नमो चषक अंतर्गत भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील पुरुष गटातील प्रथम क्रमांकाला ७ हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये व चषक, महिला गटातील प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये व चषक तर तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये व चषक असे बक्षीस देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.