उलवे नोड ९ : आपल्याकडे जे जे आहे त्यातील शक्य तेव्हढे दुसऱ्यांना देऊन त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या कल्याणासाठी धडपडणारा अवलिया म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत. आता तर ते घरत परिवारातील चक्क ५२ लेकी-सुना, लाडक्या बहिणी यांना घेऊन दुबईला निघाले आहेत. कामगार नेते महेंद्रशेठ घरत ITF या बहुराष्ट्रीय संघाचे एक्सिक्युटीव्ह बोर्ड मेंबर असल्यामुळे सतत परदेशात फिरत असतात. घरत परिवारात ते कर्ते पुरुष असल्यामुळे त्यांना नेहमी वाटतं की माझ्या परिवारातील माझ्या लेकि – सुना, बहिणी ह्यानी सुद्धा परदेशवारी केली पाहिजे, विमान प्रवास केला पाहिजे म्हणून ते घरत परिवारातील 52 महिलांना घेवून दुबई टूर करीत आहेत.
आजपर्यंत त्यांनी अनेकांना विमानप्रवास घडवून सर्वसामान्य कामगारांचेही विमानप्रवासाचे स्वप्न पूर्ण केले आहे. आई-वडील यांनाच देव मानून त्यांची अखेरच्या श्वासापर्यंत सेवा करण्यात त्यांनी धन्यता मानली.
महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या कुटुंबातील लेकी-सुनांना आजपर्यंत अनेक ठिकाणी देवदर्शन घडविले आहे, बहुसंख्य महाराष्ट्र फिरविला आहे. इतकेच नव्हे तर केवळ `विमान’ हा शब्द ऐकून असलेल्या घरत परिवारातील शेकडोजणींना वैष्णोदेवी-जम्मू -काश्मीर आदी ठिकाणी विमानाने तीर्थाटन घडविले. भारताचे नंदनवन असलेले काश्मीर विमानप्रवास करून दाखविले. तसेच सिंगापूर, युरोप आदी ठिकाणीही महिलांना विमानाने नेऊन त्यांनी त्यांचे परदेशवारीचे स्वप्न पूर्ण केले आहे.
आता ९ फेब्रुवारीला घरत परिवारातील लेकी-सुना, लाडक्या बहिणींना घेऊन महेंद्रशेठ घरत चक्क दुबईला निघाले आहेत. त्यामागेही त्यांची प्रामाणिक भावना आहे, की जास्तीत जास्त लेकी-सुना, बहिणींना परदेशात नेऊन तेथील देश, तेथील संस्कृती, तेथील वातावरण, तेथील लोकांचे राहणीमान, तसेच महिलांनी परदेशातील पर्यटन केलेच पाहिजे.
महेंद्रशेठ घरत हे महिलांना सन्मानाची वागणूक द्या, वडिलोपार्जित प्राॅपर्टीत समान वाटा द्या, असे फक्त म्हणत नाहीत तर प्रत्यक्ष कृती करून इतरांसमोर आदर्श घडवत आहेत. आपल्या संपत्तीतील समान वाटा मुलीला, मुलाला आणि पत्नीला देऊन त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. आता ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ते ५२ लाडक्या बहिणींना दुबईची सफर घडवून एक वेगळाच इतिहास घडवत आहेत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!