पनवेल दि.१०: भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथे नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत झालेल्या भव्य दिव्य कुस्ती स्पर्धेत रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल (पंजाब) या पैलवानाने इराणचा आंतरराष्ट्रीय पैलवान जलाल इराणला चारीमुंड्या चित करून ‘किताब’ पटकावला. लाली गुरुदास पोलला पाच लाख रुपये व मानाची गदा देऊन पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नमो चषकचे मुख्य आयोजक व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली.
या सामन्यांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, स्थायी समितीचे माजी सभापती व स्पर्धा संयोजक अमर पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक राजू शर्मा, तेजस कांडपिले, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, कळंबोली भाजप अध्यक्ष रविनाथ पाटील, कळंबोली शिवसेना शहर अध्यक्ष तुकाराम सरक, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, कळंबोली गुरुद्वारा अध्यक्ष नारिंदर सिंग भुल्लर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमर ठाकूर, मनिषा निकम, पै.बबन पवार, पै. रुपेश पावशे, योगेश लहाने, गौरव नाईक, देविदास खेडकर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक, यांच्यासह कुस्तीप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हलगीच्या नादात खेळाडू आणि मान्यवरांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. एकाहून एक रोमांचक सामने, भव्य दिव्य स्वरूपात आयोजन, प्रेक्षकांची तुफान गर्दी, खणखणीत आवाजात कुस्तींचे समालोचन यामुळे वातावरण उत्साहपूर्ण होते.
महिलांच्या गटात महाराष्ट्र चॅम्पियन पै. अमेधा घरत (पनवेल) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. अंकिता फातले (कोल्हापूर) यांचा खास आकर्षण सामना झाला त्यामध्ये अमेधा घरतने बाजी मारत ५१ हजार रुपये व मानाची गदा पटकावली. वरिष्ठ मुले ७९ ते १२५ किलो वजनाखालील गटात शुभम वरखडे याने श्रेयस करे याचा पराभव करून नमो केसरी मानाची गदा पटकावली. ७० ते ७९ किलो वजनाखालील गटात प्रतीक हातमोडे प्रथम क्रमांक तर विशाल पुजारी द्वितीय क्रमांक, ६० ते ७० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक किरण ढवळे, साजन पावशे द्वितीय क्रमांक, ५० ते ६० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक राज पाटील तर द्वितीय क्रमांक सूरज झा, ७० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक सुदर्शन आसदर, वेदांत यलकर द्वितीय, ६५ किलो वजनाखालील गटात भूषण पवार प्रथम क्रमांक, प्रीत भोईर द्वितीय, ६० किलो वजनाखालील गटात वेदांत पाटील प्रथम क्रमांकमी द्वितीय क्रमांक रुद्र पाटील,५५ किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक ओम म्हात्रे, सुमित विरकर द्वितीय क्रमांक, ५० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक शुभम करांडे, द्वितीय अभिषेक साह, ४५ किलो वजनाखालील गटात विश्वजीत घोगे प्रथम क्रमांक, सनी कुमार द्वितीय,४० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक सुनील म्हात्रे, सोहम ढणे द्वितीय क्रमांक, ३५ किलो वजनाखालील गटात तनिष्क पाटील प्रथम क्रमांक, नितेश मंडळ द्वितीय, तसेच १७ वर्षाखालील मुले गटातील ३० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक करण कातकरी तर द्वितीय क्रमांक आशिषकुमार पाल याने पटकावला. महिला ५७ ते ७६ किलो वजनाखालील गटात रितिका कारंडे हीच पराभव करत अमेधा घरत हिने प्रथम क्रमांक पटकावून नमो केसरी मानाची गदा मिळवली. ५० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक शौर्या कोळेकर, द्वितीय क्रमांक श्रुती कोंडविलकर, ४५ किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक ईश्वरी गळवे तर द्वितीय क्रमांक साची महतो, ४० किलो वजनाखालील गटात निर्जला साही प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक निलम कातकरी हिने मिळवला. या स्पर्धेत महिलांच्या गटातील महाराष्ट्र चॅम्पियन पै. अमेधा घरत हिने तीनही सामन्यात विशेष चमकदार कामगिरी केली. त्यामुळे ती या स्पर्धेतील लक्षणीय पैलवान ठरली. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती व स्पर्धा संयोजक अमर पाटील आणि सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

क्रिकेटमध्ये भिंगारी संघ अव्वल
नमो चषक २०२५ अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. त्यांना १ लाख ११ हजार १११ रुपये व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत उपविजेता वहाळ संघ तर तृतीय क्रमांक वळवली संघाने मिळवला. या स्पर्धेतील मालिकावीर वळवली संघाचा सुयोग म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज वहाळ संघाचा प्रयास कोळी, उत्कृष्ठ गोलंदाज वहाळ संघाचा घनश्याम पाटील तर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक भिंगारी संघाचा सूरज परदेशी ठरला.
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत खारघर मधील सेक्टर १४ येथील जय हनुमान चेरोबा बापदेव मैदानावर प्रवीण स्पोर्टस वेल्फेअर असोसिएशनच्या संयोजनाखाली भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा दिवस-रात्र या स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उपविजेत्या संघाला ५५ हजार ५५५ रुपये तर तृतीय क्रमांकाच्या संघास ३३ हजार ३३३ रुपये तसेच मॅन ऑफ दि सिरीजला दुचाकी मोटारसायकल अशी भरघोस पारितोषिकांसोबत दररोज प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये एकूण चार सायकल बक्षीस देण्यात आली. या स्पर्धेत कानपोली, दापोली, मुर्बी, पेठ, बामणडोंगरी, कुंडेवहाळ, कामोठे, ओवळे, बापदेव पोदी, भैरवनाथ विचुंबे, स्व. महादेव पेठाली, अथर्व इलेव्हन घोट, गावदेवी भातानपाडा, हिमांशू वळवली, मंगलमूर्ती घरकुल, जय हनुमान नावडे, यंगस्टार वहाळ, जिवा इलेव्हन पेंधर, धाकटा खांदा, शनिकृपा कोपरा, शिवशक्ती खारघर, श्रीराम शिरढोण, उलवा आणि ओम साई भंगारपाडा या नामवंत २४ संघांचा सहभाग होता. या स्पर्धेचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध झालेली हि स्पर्धा खेळाडू तसेच क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरली.

फुटबॉल स्पर्धेत एसएसएफए बी संघाची किक सरस
उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक २०२५ क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत एसएसएफए बी संघाची किक सरस ठरली. या संघाने ४२० या संघावर मात करून फुटबॉल चषक पटकाविला. तर तृतीय क्रमांकावर एसबीएससी संघाला समाधान मानावे लागले.
कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेला लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेचे उदघाटन माजी नगरसेवक विजय चिपळेकर व माजी नगरसेवक हेमलता गोवारी यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अजय बहिरा,भाऊ भगत, रवी गोवारी, कामोठे महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनिता पाटील, भाजपचे शहर सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, मनोहर शिंगाडे, साधना आचार्य, तसेच स्पर्धा समन्वयक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस अभिषेक भोपी, कामोठे अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्या संघाला २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये आणि सर्व विजेत्या संघास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे उत्तम नियोजन या ठिकाणी होते. भव्य स्वरूपात झालेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंना एक व्यासपीठ मिळाले. त्यामुळे खेळाडूंनी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!