पनवेल दि.११: महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्या न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेचा आढावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी घेतला. पाणीपुरवठ्यामध्ये येणार्या तुटीची भरपाई करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी योजनेचे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सूचित केले.
पनवेल महापालिकेत झालेल्या या बैठकीला प्रांताधिकारी पवन चांडक, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता रमेश वायदंडे, वेगुर्लेकर, एमएसआरडीसीचे करंजकर, मनपा उपायुक्त गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पनवेल शहर वरिष्ठ निरीक्षक पोलीस नितीन ठाकरे, खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे आदी उपस्थित होते.
योजनेच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कंत्राटदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पूर्ण सहकार्य करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. या योजनेचे काम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांचा समन्वय सुनिश्चित करण्यात आला. योजनेच्या वेळेत अंमलबजावणीसाठी उपस्थित अधिकारी आणि कंत्राटदारांनी पूर्ण बांधिलकी दर्शवली.