पुणे दि.११: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या 12 वीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली.
ठाणे, पालघर आणि रायगड यांचा समावेश असलेल्या मुंबई विभागातून तीन लाख ३८ हजार ४७८ विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2015 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. यंदाच्या वर्षी राज्यात एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली असून त्यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत. तर यंदा 37 तृतीयपंथी नागरिकही परीक्षेसाठी बसले आहेत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!