पनवेल दि.३: नवीन पनवेल येथील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीमध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. मृत्यूनंतर नेत्रदान केल्याने दृष्टीहीन व्यक्तीच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश निर्माण होऊ शकतो, असा संदेश नागरिकांना देण्यात आला.
या उपक्रमासाठी हॉस्पिटलचे युनिट हेड डॉ. राजेश कापसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदान जनजागृती रॅली उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.
“नेत्रदान हे श्रेष्ठ दान असून, आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश निर्माण होऊ शकतो,” असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!