रोहा दि. ३०: हेटवणे येथे “कॅप्टन तेलंगे फाउंडेशन” चा स्थापना समारोह महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ह्यांच्या हस्ते पार पडला.
कॅप्टन तेलंगे फाउंडेशन उद्घाटन प्रसंगी निम्मित साधून हेटवणे गावात स्वर्गीय माणिकराव बाजीराव तेलंगे बस स्टँड नूतनीकरण व सोलर लाईट पोल ह्याचे लोकार्पण व जिल्हा परिषद शाळा साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तेलंगे कुटुंबीयांचे अनेक वर्षांच्या नात्याला व स्वर्गीय माणिकराव बाजीराव तेलंगे यांच्या आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला.
या वेळी रोहा अष्टमी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, संदीप तटकरे, सभापती – पंचायत समिती रोहा विजया विनोद पाशिलकर, समीर जनार्दन शेडगे, नरेंद्र जाधव, राकेश शिंदे, संजय मांडलूस्कर उप सभापती – पंचायत समिती रोहा, नगरसेविका नीता हजारे, राजेश काफरे, वैभव साबळे, प्रशांत साबळे, दर्शन मोतीराम तेलंगे, सचिन जनार्दन शेडगे, अल्ताफ चोरडेकर, हेटवणे गावातील ग्रामस्थ व रोहा तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी तसेच जय बजरंग मंडळ या सर्वांची उपस्थिती लाभली.
रायगड जिल्ह्यातील पहिली महिला नाविक कॅडेट तन्वी मिलिंद लहाने व विहान अजित तेलंगे यांचाही या प्रसांगी सत्कार करण्यात आला.
कॅप्टन प्रसाद तेलंगे ह्यांनी आपल्या २० वर्षांच्या समुद्रातील जीवनाचे प्रवास सांगत, स्थापित केलेल्या फाउंडेशन चे शैक्षणिक व सामाजिक उद्दिष्ट व केलेले कामं सांगितली.
कॅप्टन प्रसाद तेलंगे, चैत्राली प्रसाद तेलंगे, अजित तेलंगे, विभावरी अजित तेलंगे, कुसुम सोनवणे, अरुणेश चोरगे, आदित्य कोंढाळकर, विजय काते, आकाश तेलंगे, प्रणित तेलंगे, हरी तेलंगे, ओम तेलंगे, वैभव तेलंगे, अंकुश तेलंगे, सचिन कुर्ले, साविओ फर्नांडिस, अभिषेक निकम यांनी या उपक्रमास अथक परिश्रम घेतले.
