पनवेल दि २४: दिवाळी आणि दिवाळी पहाट हे आता अद्वैतच झाले आहे. पण आता या दिवाळी मैफलींमध्ये तोचतोपणा येऊ लागला आहे. तीच ती वर्षानुवर्षे ऐकायला मिळणारी गाणी.. तेच ते ठराविक छापाचे निवेदन आणि तेच ते सादरीकरण ! काही निवडक संस्था मात्र या चाकोरीबद्ध कार्यक्रमांपेक्षा काही वेगळं करताना दिसतात. सतत नाविन्याची कास धरणार्‍या पनवेल कल्चरल सेंटरनेही अशीच वेगळी वाट चोखाळत ‘प्रातःस्वर’ हा कार्यक्रम आयोजिला आहे. ही प्रात:कालीन रागांवर आधारित गायन-वादनाची सुरेल अशी मैफल असेल आणि यात तोडी, अहिर भैरव, ललत, भटियार आणि भैरवी अशा सकाळच्या पहिल्या प्रहरातील रागांतील रचना, गत, बंदिशी आणि या रागांवर आधारित नाट्यगीते, चित्रपटगीते सादर केली जातील. यात सहभागी असतील, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते प्रख्यात शहनाई वादक पं.शैलेश भागवत, वाद्यवृंद आणि ध्वनिमुद्रण क्षेत्रातील अग्रगण्य सतारवादक पं. उमाशंकर शुक्ला, बॉलीवूड बासरी वादक रणजीत नायक आणि पं. संजीव अभ्यंकर यांची शिष्या मुग्धा गांवकर. यांना तबलासाथ करतील – पं. नयन घोष यांचे शिष्य महेशराज साळुंके आणि हार्मोनियमसाथ करतील -अथर्व कुलकर्णी. सुप्रसिद्ध निवेदक अभिजीत कुलकर्णी या कार्यक्रमाचं निवेदन करतील. हा कार्यक्रम रविवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वा. ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, पनवेल येथे पनवेल कल्चरल सेंटर, ज्येष्ठ नागरिक संघ, पनवेल आणि सूर निरागस हो सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडेल. या तिन्ही संस्थांच्या सदस्यांना प्रवेश विनामूल्य असेल तर सदस्येतर रसिकांसाठी प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध असतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : नंदकुमार कर्वे : 9869430269 अथवा किरण बापट : 84548 63342

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133