लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान
पनवेल दि.२४: भाजप उत्तर रायगड कामगार जिल्हा आघाडी अंतर्गत पनवेल उत्तर मंडलातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या नियुक्त्यांमध्ये गोविंद नामदेव पाटील यांची पनवेल उत्तर मंडल चिटणीसपदी, नितीन भोईर आणि प्रथमेश म्हात्रे यांची पनवेल उत्तर मंडल उपाध्यक्षपदी, अमित रॉय यांची उत्तर भारतीय कामगार आघाडी अध्यक्षपदी, विघ्नेश पाटील यांची एमआयडीसी उपाध्यक्षपदी, तर अनिरुद्ध पाटील यांची उत्तर मंडल सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी रायगड जिल्हा उत्तर कामगार आघाडीचे अध्यक्ष रवींद्र नाईक, पनवेल तालुका उत्तर मंडळ अध्यक्ष हरेश पाटील, उपेंद्र मराठे, कार्यालयीन चिटणीस मधुकर उरणकर, सहचिटणीस बाळाराम पाटील, प्रसिद्धीप्रमुख राजपाल शेगोकार, सदस्य श्याम भगत, सचिव मोहन घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्ती झाल्याने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या नियुक्त्यांमुळे संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळून कामगारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी तसेच संघटनेचा जनसंपर्क अधिक व्यापक करण्यासाठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133