पनवेल दि.२७: भारतीय नौदलात निवड होऊन देशसेवेची संधी मिळविणाऱ्या अथर्व रवींद्र गाताडी याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अथर्वचे वडील रवींद्र भालचंद्र गाताडी, आई मीना गाताडी, काका प्रा. संदीप गाताडी, भाजपा उरण पूर्व मंडल अध्यक्ष शशिकांत पाटील तसेच प्रा. पंकज प्रमोद खारकर उपस्थित होते.
अथर्वचे वडील रवींद्र भालचंद्र गाताडी हे ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टमध्ये कार्यरत आहेत, तर त्याचे काका प्रा. संदीप गाताडी हे रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एका सामान्य कुटुंबातील मुलाने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय नौदलात प्रवेश मिळविणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनप्रवासातून आणि कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या संस्थेत काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा भारतीय नौदलात अधिकारी होण्याच्या दिशेने वाटचाल करीत देशसेवेचे स्वप्न साकार करतो, तर दुसरीकडे सामान्य कुटुंबातील व्यक्ती शिक्षणाच्या माध्यमातून प्राध्यापकपदापर्यंत पोहोचते, ही त्यांच्या कार्यातून निर्माण झालेल्या प्रेरणादायी वातावरणाची साक्ष आहे. अथर्वने अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यदलातील अग्निवीर प्रक्रियेत यश मिळविले असून, त्याची भारतीय नौदलात नियुक्ती झाली आहे. त्याच्या या यशामुळे गाताडी कुटुंबासह परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अथर्वचे कौतुक करत देशसेवेच्या या महत्त्वपूर्ण प्रवासात त्याने उत्तुंग यश संपादन करावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. अथर्वच्या यशाने तरुणांसमोर मेहनत, जिद्द आणि देशसेवेच्या ध्येयाचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133