पनवेल दि.२४: भव्य दिव्य आयोजन आणि स्पर्धकांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत दिमाखदारपणे झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ता याने ‘नमो चषक २०२५ किताब’ पटकाविला. १ लाख ११ हजार रुपये आणि चषकाचा तो मानकरी ठरला.
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने २३ ते २५ जानेवारी पर्यंत ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजन उलवा नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग असलेली राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्स्फूर्तपणे व उत्कृष्ट नियोजनात आणि क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडली. या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मोरे, सरचिटणीस अजय खानविलकर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व नमो चषक स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, माजी स्थायी समिती सभापती अजय बहिरा, अमर म्हात्रे, विजय घरत, जयवंत देशमुख, भार्गव ठाकूर, अंकुश ठाकूर, विश्वनाथ कोळी, स्वप्नील ठाकूर, शैलेश भगत, स्पर्धा समन्वयक मयुरेश नेतकर, शरीरसौष्ठव स्पर्धा संयोजक दिनेश शेळके, विचुंबे ग्रापंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत इंडियन नेव्हीचा पी. टी. अनबन उपविजेता ठरला, प्रथम उपविजेता मुंबईचा सागर कातुर्डे, उत्कृष्ट पोझर म्हणून मुंबई उपनगरचा हरमित सिंग याने तर प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू म्हणून पुण्याच्या विशाल सुरवसे याने मान मिळवला. सांघिक विजेतापद रायगड संघाने, उपविजेता म्हणून पुणे संघाने, तृतीय क्रमांक मुंबई उपनगर, चतुर्थ क्रमांक मुंबई तर सांघिक पाचवा क्रमांक ठाणे पश्चिम संघाने पटकावला. ८५ प्लस वजन गटात प्रथम क्रमांक पी. टी. अनबन (इंडियन नेव्ही), द्वितीय क्रमांक हरमित सिंग (मुंबई उपनगर ), तृतीय क्रमांक सोहम चाकणकर (पुणे ), चतुर्थ क्रमांक निलेश रेमजे (मुंबई), पाचवा क्रमांक अभिषेक लोंढे (मुंबई) तर सहावा क्रमांक जीवन सकपाळ(मुंबई ), तर ८५ किलो खालील वजन गटात प्रथम क्रमांक विशाल सुरवसे (पुणे), द्वितीय क्रमांक संदेश सामंत (सिंधुदुर्ग), तृतीय क्रमांक सुखदीप सिंग (रायगड), चतुर्थ क्रमांक अर्जुन शर्मा (ठाणे), पाचवा क्रमांक महेंद्र पाचपुते (पुणे) तर सहावा क्रमांक ऋत्विक जाधव (पुणे) याने पटकावले.
८० किलो खालील वजन गटात प्रथम क्रमांक सागर कातुर्डे (मुंबई), द्वितीय क्रमांक कमलेश अंबारा (पुणे), तृतीय क्रमांक संजय प्रजापती (मुंबई), चतुर्थ क्रमांक अक्षय शिंदे (पुणे ), पाचवा क्रमांक प्रभाकर पाटील (रायगड) तर सहावा क्रमांक सचिन हगवणे (पुणे) , ७५ किलो खालील वजन गटात प्रथम क्रमांक भगवान बोराडे (मुंबई उपनगर), द्वितीय क्रमांक आकाश दडमल (पुणे), तृतीय क्रमांक उदय देवरे (रायगड), चतुर्थ क्रमांक विशाल धावडे (उपनगर), पाचवा क्रमांक मंगेश भोसले (पश्चिम ठाणे) तर सहावा क्रमांक अक्षय शिंदे (पुणे), ७० किलो खालील वजन गटात प्रथम क्रमांक उमेश गुप्ता(उपनगर), द्वितीय क्रमांक स्वप्नील नरवडकर (इंडियन नेव्ही), तृतीय क्रमांक संकेत भरम (उपनगर), चतुर्थ क्रमांक दीपक राऊळ (रायगड), पाचवा क्रमांक प्रशांत पोराळे (पुणे) तर सहावा क्रमांक रोशन दळवी (कोल्हापूर ), ६५ किलो खालील वजन गटात प्रथम क्रमांक उद्देश ठाकूर (रायगड), द्वितीय क्रमांक नरेंद्र व्हालेकर (पुणे), तृतीय क्रमांक संदीप सावळे (उपनगर ), चतुर्थ क्रमांक सचिन सावंत (पुणे ), पाचवा क्रमांक निलेश धोंडे (पुणे) तर सहावा क्रमांक सचिन बोईनवाड (पश्चिम ठाणे), ६० किलो खालील वजन गटात प्रथम क्रमांक बाळू काटे (पुणे), द्वितीय क्रमांक गणेश पाटील (रायगड), तृतीय क्रमांक जितेश मोरे (मुंबई), चतुर्थ क्रमांक जुगल शिवणे (रायगड), पाचवा क्रमांक सुयश सावंत (उपनगर) तर सहावा क्रमांक अमोल वायल (पुणे),
५५ किलो खालील वजन गटात प्रथम क्रमांक हनुमान भगत (रायगड), द्वितीय क्रमांक राजेश तारबे (मुंबई), तृतीय क्रमांक अजय ओजरकर (पुणे), चतुर्थ क्रमांक संजय भोपी (रायगड), पाचवा क्रमांक दीपक कांबळे (पुणे) तर सहावा क्रमांक संदेश भोईर (रायगड), १७१ सेंटीमीटर वरील गटात प्रथम क्रमांक बॉबी पाटील (रायगड), द्वितीय क्रमांक राजेश सिंग (पालघर), तृतीय क्रमांक शुभम पवार (पुणे), चतुर्थ क्रमांक मयूर शिंदे (नाशिक), पाचवा क्रमांक रोहन ठाकूर (रायगड) तर सहावा क्रमांक अक्षय शिंदे (पुणे), १७१ सेंटीमीटर खालील गटात प्रथम क्रमांक रोहन वाणी (रायगड), द्वितीय क्रमांक नरेंद्र वाल्हेकर (पुणे), तृतीय क्रमांक अनिकेत पाटील (रायगड), चतुर्थ क्रमांक निलेश गुरव (उपनगर), पाचवा क्रमांक सचिन बोईनवाड (पश्चिम ठाणे) तर सहावा क्रमांक कौस्तुभ पाटील (रायगड), मास्टर ४० प्लस गटात प्रथम क्रमांक रवींद्र माने (इंडियन नेव्ही), द्वितीय क्रमांक कुमाम कोईरेम्बा (ठाणे), तृतीय क्रमांक दीपक राऊळ (रायगड), चतुर्थ क्रमांक स्वप्नील अशाइत (पालघर), पाचवा क्रमांक चिराग पाटील (पालघर) तर सहावा क्रमांक जयप्रकाश नार्वेकर (सिंधुदुर्ग) याने पटकावला. या सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

  • स्पर्धा बक्षिस स्वरूप –
    ‘किताब विजेता’ – ०१ लाख ११ हजार रुपये
    उपविजेता – ५१ हजार रुपये
    तृतीय क्रमांक – २१ हजार रुपये
    बेस्ट पोझर – ११ हजार रुपये
    सांघिक विजेता – ११ हजार रुपये
    सांघिक उपविजेता – ०८ हजार रुपये
    सांघिक तृतीय क्रमांक – ०६ हजार रुपये
    सांघिक चतुर्थ क्रमांक – ०५ हजार रुपये
    सांघिक पाचवा क्रमांक – ०४ हजार रुपये
    ८५, ८०, ७५, ७०, ६५, ६०, ५५ किलो वजनाखालील गट, ८५ किलो वरील गट, १७१ सेंटीमीटर खालील व १७१ सेंटीमीटर वरील, आणि मास्टर ४० प्लस या प्रत्येक गटातील अनुक्रमे प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १२ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ०८ हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास ०६ हजार रुपये, पाचव्या क्रमांकाला ०४ हजार रुपये तर सहाव्या क्रमांकाला ०३ हजार रुपये रक्कम बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!