पनवेल दि.२४: महाराष्ट्र राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी यांचा आनंद मेळावा बुधवार दि. २२ रोजी कॉंग्रेस भवन पनवेल येथे मोठ्या उत्सहात संपन्न झाला सदर कार्यक्रमावेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांना श्रीफळ शाल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आपले वक्तव्य सुद्धा मांडले. सदर वेळी महाराष्ट्र राज्याचे परिवहन विभागाचे सेवानिवृत्त सरचिटणीस सदानंद विचारे, खजिनदार वाफलकर साहेब, मुंबई विभागाचे सरचिटणीस रामदास म्हसकर, उरण पनवेल युनिटचे अध्यक्ष चंद्रकांत आनंदे, मुंबई विभागाचे कार्याध्यक्ष रफिक शेख, उरण युनिटचे खजिनदार लाखन साहेब, सेक्रेटरी कवर साहेब, सदस्य शैला पितळे, सदस्या सीमा देशमुख, सदस्या विद्याधर मोकळ, रायगड विभागचे सरचिटणीस पाटील साहेब, राम भगत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश प्रतिनिधी आर. सी. घरत, पनवेल शहर जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्ष निर्मला म्हात्रे उपस्थित होते व त्याच बरोबर या कार्यक्रमामध्ये पनवेल, उरण, मुंबई विभागामधून महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.