पनवेल दि. १४ (संजय कदम) : उभ्या गाडीची काच फोडुन आतील मौल्यवान दागीने व रोख रक्कम चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून मौल्यवान दागिन्यासह रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन हस्तगत केले आहे .
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गो ग्रिन हॉटेल, कल्ले गाव या हॉटेलचे पार्कीगमध्ये पार्क करुन ठेवलेल्या फॉर्च्यूनर कार चे डाव्या बाजुची काच फोडुन गाडीतील पर्समधील एकूण ८,४८,५००/- रु.. किमतीचे दागीने व रोख रक्कम चोरी केली असून या बाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हयाचा तांत्रीक तपास व गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त करण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोहवा महेश धुमाळ, पोहवा सुनिल कुदळे, पोहवा सतिष तांडेल व पोहवा शिवाजी बाबर यांचे पथकाने इंडी, जि. विजापूर, कर्नाटक येथे जावून सापळा रचून शेरा सुरेश चव्हाण, वय ४१ वर्षे व विनोद उर्फ लंगडा अशोक पवार, वय ४३ वर्षे, यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडून गुन्हयातील चोरी केलेले तोळे सोने व लेडीज पर्स असा एकूण १८३,५००/- किमतीचा ऐवज व आरोपीनी गुन्हयात वापरलेली रु. ७०,०००/- किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. दोन्ही अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.
![]()
