पनवेल दि.८: रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारो उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज चांगू काना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे झालेल्या या मेळाव्यात तब्बल ६४ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्याने रोजगाराच्या विविधक्षेत्रांतील संधी उमेदवारांसाठी उपलब्ध झाल्या.        भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्यात दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच विविधकौशल्ये असलेल्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सकाळपासूनच मेळाव्याच्या ठिकाणी युवक-युवतींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याचे उदघाटन पनवेलचे महापौर नितीन पाटीलयांच्या हस्ते झाले. या मेळाव्यास ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे. एम.म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक व नगरसेवक परेश ठाकूर, उपमहापौर प्रमिला पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, प्रल्हाद केणी, नगरसेवक दशरथ म्हात्रे, डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, रवींद्र भगत, समीर ठाकूर, राजू सोनी, एकनाथ गायकवाड, मधु पाटील, प्रवीण पाटील, अमर पाटील, विकास घरत, नगरसेविका प्रतिभा भोईर, सीतापाटील, जिल्हा परिषद सदस्या कमला देशेकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, काशिनाथ पार्टे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, स्वप्निल ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, ऍड.चेतन जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, कामगार नेते जितेंद्र घरत, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाईक, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, भाजपचे शहर चिटणीस रुपेश नागवेकर, ओबीसी सेलचे राजेश गायकर, रामनाथ पाटील, डॉ.संतोष आगलावे, युवा मोर्चाचे नविन पनवेल अध्यक्ष मयूर कदम, पनवेल शहर अध्यक्ष हिमेश बहिरा, चिन्मय समेळ, अक्षयसिंग, विश्वजीत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या करिअरला योग्य दिशा देणे, या उद्देशाने भविष्यातही अशा उपक्रमांना 
प्रोत्साहन देणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले. ६४ कंपन्यांच्या सहभागामुळे विविधउद्योग आणि रोजगार क्षेत्रांतील संधी एकाच छताखाली उपलब्ध झाल्या. यामध्ये २५०२ उमेदवारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिकपात्रता, कौशल्यआणि अनुभवाच्या आधारे विविधपदां साठी मुलाखती घेतल्या. त्यामुळेअनेक उमेदवारांना रोजगाराच्या संधींसोबतच करिअर विषयक मार्गदर्शन आणि उद्योगक्षेत्रातील आवश्यक कौशल्यांची माहिती मिळाली. या मेळाव्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स, असाही इंडिया ग्लास लिमिटेड,  युनिकेअर हेल्थकेअर, इकोशाईन फॅसिलिटी सोल्युशन्स एलएलपी, आयपीएस ग्रुप्स, पटेल ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सदरलँड, लिशियस, फॉर्च्यून सिम्बॉलॉजी रिसर्चसेंटर, युवाशक्ती स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, क्युअर फूड्स, एनआयआयटी फाउंडेशन, सिमरन मोटर्स, ॲक्सिस बँक, वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्स, टाटा स्ट्राइव्ह, झेप्टो, ब्लूमबे एंटरप्रायझेस, डिजिटाइड सोल्युशन्स, १ पॉइंट १, प्रशांत कॉर्नर प्रायव्हेट लिमिटेड, सोडेक्सो इंडियासर्व्हिसेस प्रायव्हेटलिमिटेड, आर पॉवर, इंजेनिक्स, यूएम सर्व्हिसेस, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, एसबीआय कॅप सिक्युरिटीज, महिंद्रा इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन्स, मुथूट फायनान्स लिमिटेड, एस. एच. केलकर, नेटटेक इंडिया, क्वेस कॉर्पलिमिटेड, टॅलीउन्नती इन्फो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, शेट्टी इन्फ्रासर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, अरकॅश इंडिया एलएलपी, ऑटोबानट्रकिंग कॉर्पोरेशनप्रायव्हेट लिमिटेड, एसके ग्रुप, डीआर एस अर्थवर्क प्रायव्हेट लिमिटेड, पॅराडाइम आयटी टेक्नॉलॉजीज सर्व्हिसेस प्रायव्हेटलिमिटेड, झेनिथ्रा ग्लोबल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, द अक्षय पात्र फाउंडेशन, कोटक बँक लिमिटेड, मेरिट्यूड स्किल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, केमस्पेक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, आईसबर्ग इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, व्ही-इन्शुअर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, श्रीटेक्नोक्रॅट कम्युनिकेशनसिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड (एसटीसीएस), अभिनव इन्स्टिट्यूटऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, वॉट्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, अमुवा कॉर्पोरेशन, रेडविंग मॅनेजमेंटफॅसिलि टेटर्स प्रायव्हेट लिमिटेड, गार्गीहटेन्स अल्बर्टस प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबवर्क इन्फोटेक, टाइम्सप्रो (टाइम्सऑफ इंडियाग्रुप), एनआयआयटी लिमिटेड – आयएफबीआय, आयडीबीआय इन्फोटेक लिमिटेड, बीटीडब्ल्यू फायनान्शियल सर्व्हिसेस अँड आयएमएफ प्रायव्हेट लिमिटेड, प्रोव्हॅल्यू बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, आयप्रोसेस सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड, पीपल लॅब ॲडव्हायजरी, स्मार्टटेक बिझनेस मॅनेजमेंट, मायवेटेक्नॉलॉजीज, कोडर टेक्नॉलॉजीज आदी कंपन्यांचा सहभागहोता.
या मेळाव्याचे अत्यंतनियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध आयोजनकरण्यात आले होते. उमेदवारांचीनोंदणी, कंपन्यांची माहिती, मुलाखतीसाठी स्वतंत्र व्यवस्था, मार्गदर्शन कक्ष तसेच उमेदवारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. हजारो उमेदवारांची उपस्थिती असूनही संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. आयोजक, स्वयंसेवकआणि संबंधित कार्यकर्त्यांच्या समन्वयामुळे मेळाव्याचे उत्तम नियोजन पाहायला मिळाले. आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांना केवळ शिक्षणचनव्हे तर त्यांच्या कौशल्यालायोग्य रोजगाराचीसंधी मिळणे अत्यंत गरजेचेआहे. ही गरज लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामुळे पनवेल आणि परिसरातील युवकांना रोजगार, करिअरआणि उद्योगक्षेत्राशी थेट जोडले जाण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले. यावेळी सहभागी झालेल्या उमेदवारांनी मेळाव्याच्या आयोजनाचे आणि उपलब्ध करून देण्यातआलेल्या रोजगाराच्या विविध संधींचे कौतुक केले. ६४ कंपन्यांचा सहभाग आणि हजारो उमेदवारांची उपस्थिती यामुळे ‘महारोजगार मेळावा२०२६’ हा पनवेलमधील रोजगाराच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आणि यशस्वी उपक्रम ठरला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!