रायगड दि. 24: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या अधिकार कक्षेमध्ये वास्तव्य करणाऱ्या “VAHAN” या संगणक प्रणालीवर परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहने नोंदणी करु इच्छिणाऱ्या धारकांसाठी MH-46 CT ही नवीन मालिका सध्याची सुरु MH-46 CS मालिका संपल्याबरोबर सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 54 (अ) अन्वये नवीन नोंदणी मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करुन आरक्षित करण्यासाठी इच्छूक जनतेकडून दि.26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या कार्यालयीन वेळेमध्ये अर्ज स्विकारले जातील अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच प्रतिनिधी असतील तर प्राधिकार पत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी केलेले अर्ज मंजूर झाल्यास अर्जदाराने त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेमध्ये विहीत केलेले शुल्क भरणा करणे आवश्यक आहे. शासनाने अधिसूचित केलेल्या आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकासाठी शासनाने विहीत केलेले शुल्क बसूल करुन आकर्षक व पसंतीचे क्रमांक देण्यात येतील. जर एका नोंदणी क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज कार्यालयास प्राप्त झाल्यास पसंती क्रमांक लिलाव पध्दतीने जारी करण्यात येईल.
लिलाव पध्दतीने पसंती क्रमांक जारी करण्यासाठी जो पसंती वाहन क्रमांक पाहिजे आहे त्या नंबरसाठी विहीत रक्कमेचा असलेला डी. डी कार्यालयात जमा करावा व लिलावासाठी वेगळया ऐच्छिक रक्कमेचा डी.डी बंद लिफाफ्यात दि.26 ऑगस्ट 2024 रोजी दु. 1.00 वाजेपर्यंत जमा करावा, दोन्ही डी.डी जमा केल्यानंतर दि.26 ऑगस्ट 2024 रोजी दु. 4.00 अर्जदारांची बंद पाकीटे त्यांचेसमक्ष उघडण्यात येतील. ज्यांचा ऐच्छिक रक्कमेचा डी. डी जास्त रक्कमेचा असेल त्यांना सदर पसंती क्रमांक देण्यात येईल.
आकर्षक/पसंतीच्या नोंदणी क्रमांकाची शुल्क भरणा दिनांकापासून 30 दिवसांपर्यंत संबंधित क्रमांक आरक्षित राहील. त्या कालावधीत वाहनाची नोंदणी न केल्यास 30 दिवसानंतर सदर क्रमांक अनारक्षित समजला जाईल व भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी आवश्यक ते शुल्क भरल्यानंतर क्रमांक आरक्षित केला आहे, याबाबतची पावती कार्यालयाकडून दिले जाईल. व ती पावती वाहन नोंदणी करताना फॉर्म क्रमांक 20 सोबत जोडणे आवश्यक आहे. आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांक महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 54(अ) नुसार आरक्षित केल्यानंतर सदर आरक्षण क्रमांक हस्तांतरणीय नसल्याने अन्य व्यक्तीच्या नावावर वाहन नोंदणीस्तव हजर केल्यास आरक्षणाचा वापर करता येणार नाही. जर दोन्ही डी डी जमा असल्यास व्यक्ती हजर राहण्याची आवश्यकता नाही. ज्या व्यक्तीचा डी डी जास्तीचा आहे त्यांना नंबर देण्यात येईल. वाहन पसंती क्रमांक लिलाव प्रक्रिया बाबत अंतिम निर्णय नोंदणी प्राधिकारी यांचे राहतील याची नोंद घ्यावी.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!