पनवेल दि.२४: पनवेल मधील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेश मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाद्यपूजन सोहळा नुकताच पार पडला.
पनवेल शहरातील टपालनाका येथील श्री गणेश मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाद्यपुजनाचा शुभारंभ संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर करण्यात आला. टपालीचा राजा म्हणून सर्वश्रूत असलेल्या श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे 62 वे वर्ष आहे. पनवेलचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे हे मंडळ आहे. पाद्यपुजनाच्या आरंभी प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, गणेशभक्त उपस्थित होते.