पनवेल दि.०९ (संजय कदम) : सुशांत नामदेव मोरे हे त्यांचे मित्रांसोबत बेलापूर येथे हॉटेलमध्ये जेवण करुन हे मित्रांसोबत त्यांचे घराजवळ आले व कार पार्क करुन ते पायी चालत घरी जात असतांना त्यांचे पाठीमागून तीन अनोळखी इसम पळत आले व त्यांनी तक्ररदार व त्यांचे मित्रासोबत झटापट करून त्यांना मारहाण करून यांचे हातावर चाकुने वार करून जखमी केले. चालक महेश हाटे याचे हातामधील तक्ररदाराचे ५७ तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी जबरीने चोरी करून सदरचे तीन इसम हे तेथून पळून गेले. सदर अनुषंगाने खारघर पोलीस ठाणे गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन गुन्हा उघडकीस आणण्याकरीता सहा. पोलीस आयुक्त, खारघर विभाग विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बरकडे, सपोनि येवले, सपोनि दळवी सपोनि शिंदे यांच्या नेतृत्तवाखाली ४ तपास पथके तयार करुन तपास सुरु करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान तक्ररदाराचा मित्र अभिनंदन माळी याने त्यांची पत्नी व मेव्हणा तसेच त्यांचे मुळ गावाकडील साथीदार यांना माहिती देऊन खारघर येथे घेऊन येऊन गुन्हयाचा कट रचुन सदरचा गुन्हा घडवून आणल्याचे निष्पन्न झाले, सदर गुन्हयांमध्ये अभिनंदन तानाजी माळी (वय ३७ वर्षे) कोमल अभिनंदन माळी (वय २६ वर्षे) वैभव भानुदास माळी (वय २४ वर्षे) यांना अटक करण्यात आली. सपोनि दळवी यांच्या पथकाने आरोपी शुभम धनाजी पाटोळे (वय २० वर्षे), संदीप कृष्णदेव गुजंळे, (वय २० वर्षे) यांना अत्यंत शिताफितीने वडुज येथे ताब्यात घेवुन सदर गुन्हयांत अटक केली. सदर गुन्हयांतील मुख्य आरोपी हर्षद रमेश सागरे (वय २५ वर्षे), राहुल उर्फ अमित राजेंद्र माळी (वय २३ वर्षे) हे गुन्हा घडल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपवून तेलंगना, सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर या भागातील बाळू मामाच्या देवस्थानच्या पालख्यामध्ये फिरत असल्याची सपोनि बरकडे व पथकाला माहिती झाल्याने त्यांना तावशी, पंढरपुर येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असून सध्या ते पोलीस कोडठी मध्ये असून सदर गुन्हयांतील मुख्य आरोपींकडुन जबरीने चोरी केलेल ५७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे हस्तगत केलेली आहेत. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार व रायडर मोटारसायकन हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपी हे सद्या न्यायालयीन कोठडीमध्ये तर इतर आरोपी हे पोलीस कोठडीमध्ये असुन गुन्ह्याचा अधिक तपास पोनि डमाळे, खारघर पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. सहा. पोलीस आयुक्त, खारघर विभाग विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली खारघर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय जोशी, कळंबोली पोलीस ठाणेचे वपोनि राजेंद्र कोते, पोनि अशोक डमाळे, पोनि सुरज पाटील, सपोनि शरद बरकडे, सपोनि गणेश दळवी कामोठे पोलीस ठाणे, सपोनि निलेश येवले तळोजा पोलीस ठाणे, सपोनि नितिन शिंदे कळंबोली पोलीस ठाणे, तसेच खारघर पोलीस ठाणेकडील व पथकातील पोलीस अंमलदार सपोफौ आगा, पोहवा कासार, पोहवा तरकसे, पोना वावरे, पोना खेडकर, पोशि खखैरे, पोशि माळी, पोशि मोरे, पोशि घाटे, यांनी केली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!