पनवेल, दि.११ (संजय कदम) : पोलीस अंमलदार आकाश वानखेडे, सागर माळी असे बिट मार्शल १ कर्तव्यावर असताना त्यांना १२.३० वा. रोडपाली गणपती विर्सजन तलावमध्ये एका महिलेने पाण्यात उडी मारली आहे, पोलीस मदतीची आवश्यकता आहे. असा नियंत्रण कक्ष, नवी मुंबई येथुन M.D.T. वर कॉल प्राप्त झाला.
सदर वेळी पोलीस अंमलदार आकाश वानखेडे, सागर माळी यांनी घटनेचे गांर्भीर्य ओळखुन तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहचले असता त्यांना तलावात उडी मारलेली महिला तलावाचे मध्यभागी बुडत असल्याचे दिसले. पोलीस अंमलदारसागर माळी यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या जिवाची पर्वा न करता महिलेचे प्राण वाचविण्याकरीता तलावात उडी मारली. तलावाचे ठिकाणी हजर असणारे नागरिक यशु सिंग यानेही पोलीस महिलेला बाहेर काढत असताना त्यांना मदत म्हणुन तलावात उडी मारली. महिलेला खेचत किना-याजवळ आणले. किना-यावर उभा असलेल्या पोलीस अंमलदार आकाश वानखेडे यांचे मदतीने महिलेला तलावाबाहेर काढले. महिलेच्या पोटात पाणी गेल्याने ती बेशुध्द अवस्थेत होती. तात्काळ प्रथमोपचार म्हणुन पोलीस अंमलदार आकाश वानखेडे यांनी महिलेच्या पोटावर दाब देवुन पोटातील पाणी बाहेर काढले. त्यानंतर महिला थोडा श्वास घेवु लागली.
सदर महिलेला आजुबाजुचे नागरिकांच्या मदतीले सरकारी वाहनात बसवत असताना तीचा मोठा भाउ हा शोध घेत रोडपाली तलावाजवळ आला. त्यांचेसह महिलेला तात्काळ जवळच असलेल्या आशा हॉस्पीटल, सेक्टर १६, रोडपाली येथे नेले. त्यांनतर तीला उपचाराकरीता एम.जी.एम. हॉस्पीटल येथे नेण्यात आले. सदर महिलेची तब्बेत आता स्थित असुन महिला सुखरूप आहे. महिलेचे अनमोल प्राण वाचविण्याकरीता रोडपाली तलाव येथे प्रत्यक्ष घटना पाहणारे व तात्काळ डायल ११२ वर कॉल करून माहीती देणारे बळीराम म्हात्रे, घटनेचे गांर्भीय ओळखुन डायल ११२ वर प्राप्त झालेला कॉल कळंबोली बिट मार्शलला वर्ग करणारी नियंत्रण कक्ष, नवी मुंबई येथील महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा गायकर, घटनेचे गांर्भीय ओळखुन कॉल प्राप्त होताचा तात्काळ घटनास्थळी रवाना झालेले व जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून महिलेचा जीव वाचवणारे पोलीस अंमलदार सागर माळी, महिलेच्या पोटात पाणी गेल्याने प्रसंगावधान दाखवुन बेशुध्द झालेल्या महिलेला वेळीच प्रथमोपचार देवुन पोटातील पाणी बाहेर काढणारे पोलीस अंमलदार आकाश वानखेडे व पोलीसांना पाण्यात उडी मारलेली पाहुन महिलेला बाहेर काढण्यास स्वतः पाण्यात उडी मारून पोलीसांना मदत करणारे यशु सिंग यांनी मोलाची भुमीका बजावली आहे.मा. पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांनी पोलीस अंमलदार यांचा यथोचित सत्कार करून भविष्यात पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अशी कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहीत केले. घटनेची तात्काळ माहीती देणारे बळीराम म्हात्रे व घटनास्थळी मदत करणारे यशु सिंग यांचाही विक्रम कदम, सहा. पोलीस आयुक्त, खारघर विभाग, नवी मुंबई यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला आहे. नागरिकांची सतर्कता व प्रसंगावधान तसेच डायल ११२ च्या योजनेमुळे महिलेला तात्काळ मदत मिळुन महिलेचे अनमोल प्राण वाचले आहेत. नागरिकांनी मदतीच्या काळात डायल ११२ चा वापर करावा असे आपल्या माध्यमातुन आवाहन करण्यात येत आहे.
