माथेरान दि.३१ (मुकुंद रांजणे) माथेरान हे मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेले सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे मात्र येथे वाहनांना बंदी असल्याने अमानुष अश्या हात रिक्षाचा वापर वाहतुकी साठी केला जात आहे. या हातरिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी यासाठी श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनिल शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली व पर्यावरण पूरक ई रिक्षांची मागणी केली. कोर्टाने मागणी मान्य केली व राज्य सरकारने गठीत केलेल्या सनियंत्रण समितीला ई रिक्षांची संख्या मर्यादित ठेवणे व जे पूर्वी पासून हातरिक्षा ओढत आहेत व ई रिकशा सुरू झाल्याने ज्यांचे आर्थिक नुकसान होत आहे अश्यानाच ई रिक्षा देण्यात याव्या असे आदेश दिले होते. परवाना धारक हातरिक्षा चालकांची संख्या 94 आहे यातील 20 चालकांना तूर्तास ई रिक्षाची सनियंत्रण समितीने परवानगी दिली आहे. दि 10 जून पासून या 20 ई रिक्षा सुरू झाल्या आहेत मात्र याचा परिणाम उर्वरित 74 हातरिक्षा चालकांवर झाला आहे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे ई रिक्षा केवळ रु 35 दस्तुरी नाका टॅक्सी स्टँड ते रेल्वे स्टेशन इतका दर आकारत असल्याने पर्यटक तासनतास ई रिक्षाच्या रांगेत उभे राहणे पसंत करतात. त्यामुळे हातरिक्षा चालकांना दिवसाला पाचशे रुपये इतकी कमाई देखील मिळत नाही. सनियंत्रण समितीने उर्वरित 74 हात रिक्षा चालकांना ई रिक्षाची परवानगी देण्याची मागणी श्रमिक रिक्षा संघटनेने केली आहे.

महाराष्ट्र सरकारने दि 12 मे 2022 रोजी सुप्रीम कोर्टाला ग्वाही दिली आहे की हात रिक्षा चालकांना ई रिक्षाची परवानगी देण्यासाठी सरकार तयार आहे यासाठी कोणत्या प्रकारची ई रिक्षा चालू शकते यासाठी पायलट प्रोजेक्ट ची मागणी केली होती आतापर्यंत 5000 मिमी पाऊस पडला असून मुसळधार पावसात देखील ई रिकशा पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.

गेल्या चाळीस वर्षांपासून मी हातरिक्षा ओढत आहे. बाकी 74 चालकांना देखील सरकारने ई रिक्षाची परवानगी देऊन या अमानवीय प्रथेतुन मुक्ती द्यावी. – अंबालाल वाघेला: हातरिक्षा चालक

हातरिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती हाच याचिके मागील उद्देश आहे सुप्रीम कोर्टाने सनियंत्रण समितीला रिक्षाची संख्या निश्चित करण्याचे आदेश दिले असल्याने लवकरच त्यांना देखील ई रिक्षाची परवानगी द्यावी. – सुनिल शिंदे : याचिकाकर्ते

ई रिक्षा सुरू झाल्याने गेल्या दोन महिन्यांत पर्यटकांन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसत आहे बुकिंगच्या वेळी पर्यटक ई रिक्षाची माहिती घेऊन या सेवेचा लाभ घेत आहेत. – मोहम्मद शेख : मॅनेजर हॉटेल कुमार प्लाझा

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!