व्ही. के. विद्यालयाच्या १२० विद्यार्थ्यांचा सहभाग
पनवेल, दि.31: गणेशोत्सव जवळच आला आहे. निसर्गाचे पर्यावरण संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांसोबत विध्यार्थी वर्गाचीही आहे. पनवेल शहर स्वच्छ, सुंदर व सुरक्षित राहील त्यासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल द्वारे विठोबा खंडापा विद्यालय येथे ईरा फॉर विमेन या संस्थेच्या सहकार्याने शाडू माती च्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये सुमारे 120 विद्यार्थी सहभागी झाले होते. सदरप्रसंगी शाळा समितीचे चेअरमन माजी आमदार बाळाराम पाटील, रोटरी चे माजी प्रांतपाल व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दिपक गडगे, प्रोजेक्ट चेअरमन माजी अध्यक्षा प्रियाताई पाटील, माजी विद्यार्थी व मा.नगरसेवक गणेश कडू यांचे सह अनेक रोटरी सदस्य व एन्स उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्यध्यापिका गावित मॅडम, कला शिक्षक नेरुरकर तसेच मार्गदर्शन करण्यासाठी ईरा फॉर विमेन संस्थेच्या प्रमुख रुपाली पाटोळे व त्यांची टीम कार्यरत होती.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!