माथेरान दि.५ : (मुकुंद रांजणे) मागील तीन वर्षांपासून माथेरान मध्ये प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांची कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण केली जात नसून कामगार वर्ग हेतुपुरस्सर टाळाटाळ करून नागरिकांना वेठीस धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. जिथे आवक अधिक आहे अशा मंडळींची कामे करण्यास कर्मचारी वर्ग खूपच उतावीळ दिसत असून सर्वसामान्य लोकांना त्यांच्या साध्या छोट्याशा कामासाठी नाहक फेऱ्या मारण्यास ही कार्यालयातील मंडळी जाणूनबुजून भाग पाडत आहेत. कोण कामगार केव्हा कामावर हजर होतात याचाही ठावठिकाणा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एकंदरीतच या संपूर्ण कार्यालयात कामावर असणाऱ्या लोकांवर मुळात प्रमुख अधिकायां-चाही अंकुश नाही त्यामुळेच मनाला वाटेल त्याप्रमाणे इथला कारभार सुरू आहे. आठवड्यातील पाच दिवस कामाचे असताना दिवसभरात जेमतेम दोन ते तीन तास कामे करत असल्याचे विदारक चित्र याठिकाणी पहावयास मिळते. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष केंद्रित करून माथेरान सारख्या दुर्गम भागातील सर्वसामान्य लोकांना या कार्यालयातुन होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!