रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल यांचा आकर्षक सामना
पनवेल दि.५: उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ०६ ते ०९ फेब्रुवारी पर्यंत भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत रविवार दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी कळंबोली मधील सेक्टर १६ येथे भव्य कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख (सोलापूर) विरुद्ध रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल (पंजाब) यांचा खास आकर्षण सामना होणार असून यामधील विजेत्या पैलवानास पाच लाख रुपये व मानाची गदा, तर महिलांच्या गटात महाराष्ट्र चॅम्पियन पै. अमेधा घरत (पनवेल) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. अंकिता फातले (कोल्हापूर) यांचा खास आकर्षण सामना होणार असून विजेत्या पैलवानाला ५१ हजार रुपये व मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच पुरुषांच्या गटात महाराष्ट्र चॅम्पियन पै. निखिल कदम विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. अनिल कचरे, पै. शुभम वळखडे विरुद्ध पै. आकाश दुबे, पै. श्रेयश कचरे विरुद्ध पै. सुशांत देवमाने, पै. साजन पावशे विरुद्ध पै. निलेश कदम, आणि पै. समाधान घनपट विरुद्ध विजय घुले यांच्या सामना रंगणार आहे. महिला गटात पै. स्नेहा येवले विरुद्ध वैष्णवी यादव आणि पै. रितिका कारंडे विरुद्ध गौरी जाधव यांचा विशेष सामना होणार आहे. कुस्ती स्पर्धेतील महिला ३५, ४० व ४५ किलो वजनाखालील गटातील प्रत्येकी विजेतीला १ हजार रुपये तर उपविजेतीस ५०० रुपये, ५० किलो खालील गटातील विजेतीला १५०० रुपये व तर उपविजेतीस १ हजार रुपये, ५५ किलो वजनाखालील गटातील विजेतीला २ हजार रुपये तर उपविजेतीस १५०० रुपये आणि ५७ ते ७६ किलो वजनाखालील गटातील विजेतीस १० हजार रुपये व नमो केसरी मानाची गदा तर द्वितीय क्रमांकाला ५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ३ हजार रुपये, १७ वर्षाखालील मुले गटातील ३०, ३५, ४० व ४५ किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकास प्रत्येकी १ हजार रुपये तर द्वितीय क्रमांकाला ५०० रुपये, ५० व ५५ किलो खालील गटातील प्रथम क्रमांकाला प्रत्येकी १५०० रुपये द्वितीय क्रमांकास प्रत्येकी १ हजार रुपये, ६०, ६५ आणि ७० किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकास अनुक्रमे २ हजार रुपये, ३ हजार रुपये आणि ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास अनुक्रमे १५००, २ हजार आणि ३ हजार रुपये, वरिष्ठ मुले ५० ते ६० किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये, ६० ते ७० किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये, ७० ते ७९ किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये, तसेच ७९ ते १२५ किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला १० हजार रुपये व नमो केसरी मानाची गदा, द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला ३ हजार रुपये असे कुस्ती स्पर्धेत एकूण ८ लाख ५१ हजार रुपयांच्या बक्षिसांचे स्वरूप आहे. मानाच्या अशा या कुस्ती दंगलीचा कुस्तीप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्धेचे संयोजक कळंबोली भाजपा व पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी केले आहे.