पनवेल दि.५: मुंबई येथे संपन्न झालेल्या भाजप संघटन पर्व प्रदेश प्रशिक्षण कार्यशाळेत महाराष्ट्रातील सर्वाधिक सदस्य नोंदणी करणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. त्यानुसार पनवेल विधानसभेला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
मागील महिन्यात शिर्डीमध्ये भाजप प्रदेशचा मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट जाहीर केले होते. त्यानुसार पनवेल विधानसभा संघासाठी १ लाख १४८०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली हे उद्दिष्ट पार करत १ लाख ३० हजार सदस्य नोंदणी झाली आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश शर्मा, मंत्री पंकजा मुंडे, माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, यांच्यासह राज्यातील आमदार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. पनवेल विधानसभा मतदार संघात सदस्यता नोंदणी अभियानासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचे हे यश असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले असून त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.