HMPV ला प्रतिबंध करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये
पनवेल,दि.6 : चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या एचएमपीव्ही (HMPV) या व्हायरसच्या अनुषंगाने भारतातही एक रुग्ण आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाले असून पनवेल महानगरपालिकेच्यावतीने योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
सध्या चीनमध्ये मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) याचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये २००१ मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे .ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो.
चीनमधून आलेल्या नवीन विषाणू मानवी मेटान्यूमोव्हायरसच्या राज्य शासनाच्या आलेल्या (एचएमपीव्ही) अहवालांमध्ये चिंतेचे कारण नसल्याबाबत सांगण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

हे करा :
1 जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
2 साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
3 ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
4 भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
5 संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
हे करू नये :
1 हस्तांदोलन
2 टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
3 आजारी लोकांशी जवळचा संपर्क
4 डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
5 सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
6 डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!