कळंबोली दि.६: प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट सिंधी पंचायत ट्रस्ट व पनवेलचे विद्यार्थी वाहक संघटना पनवेल व एमजीएम हॉस्पिटल कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पूज्य सिंधी पंचायत मंदिर पनवेल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अमित देवानी, ऍड मनोहर सचदेव, पांडुरंग हुमणे, मुरलीधर ढाके, संगीता साखरे यांच्या हस्ते झाले .
या रक्तदान शिबिरामध्ये गिरीश कासट, किसन रौंधल यांनी रक्तदान केले या वेळी ऍड. अमोल शंकर साखरे यांनी आपले जीवनातील शंभरावे रक्तदान पूर्ण केले. रक्तदानाचे शतक पूर्ण करणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अमोल साखरेंचा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी एकूण १२१ रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला. तसेच आरोग्य तपासणी शिबिराला पनवेलकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. सदर रक्तदान शिबिर यशस्वी व्हावे याकरिता भूषण चोंणकर, सचिन भिसे, यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर व ऍड .विजय भगत यांनी सदिच्छा भेट दिली .

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!