पनवेल दि.४: उन्हाळ्याच्या दिवसांत जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन, शासकीय आवाहनाला प्रतिसाद देत पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘केडीएजीबी’ (KDAGB) ग्रुप आणि ओरियन मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ७ जून रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत ओरियन मॉल येथे हे शिबीर पार पडेल. या सामाजिक उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यंदा ‘आयडब्ल्युसी गॅलेक्सी न्यू पनवेल’ हे या शिबिराचे सह-प्रायोजक आहेत. महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या पनवेल परिसरात अपघातांचे प्रमाण मोठे असते. अपघातग्रस्त, ग्रामीण भागातील गरजू महिला आणि बालकांना वेळेत रक्त मिळावे यासाठी हे शिबीर अत्यंत महत्त्वाचे ठरेल. कळंबोली येथील एम.जी.एम. (MGM) हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली हे रक्त संकलित केले जाणार आहे, जेणेकरून हायवेवरील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने मदत मिळेल. “पनवेलकरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान करावे,” असे आवाहन ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!