पनवेल दि.४: पनवेलमधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कापड बाजार, जोशी आळी येथील प्रसिद्ध व पुरातन ‘श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिर देवस्थान’चा ३३१ वा वर्धापनदिन आज अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापनदिनाचे औचित्य साधून पहाटेपासूनच मंदिर परिसरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. यामध्ये मुख्यत्वे पुण्याहवाचन आणि रुद्रघनपाठाचा भव्य विधी वैदिक मंत्रोच्चारात पार पडला. या पवित्र अनुष्ठानाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. सकाळपासूनच पनवेल व परिसरातील हजारो भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात अलोट गर्दी केली होती. दर्शनानंतर सर्व भाविकांनी देवस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. सामाजिक बांधिलकीची परंपरा श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिर देवस्थान हे केवळ धार्मिक केंद्र नसून सामाजिक कार्याचा एक मोठा कणा आहे. देवस्थानचे ट्रस्टी प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी या प्रसंगी माहिती दिली की, मंदिर प्रशासनाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवले जातात. यामध्ये आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि इतर कल्याणकारी योजनांचा समावेश असतो. ही सामाजिक कार्याची परंपरा अखंडपणे पुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!