दरवर्षी एकदा तरी शिक्षकांची महेंद्र घरत आवर्जून भेट घेतात
१९७५ ते १९८० हा काळ म्हणजे ग्रामीण जनता दारिद्यात पिचलेली. दोन वेळचे पुरेसे अन्न आणि अंगभर कपडे मिळणे, हीच काय ती श्रीमंती होती. दिवसभर शेतात, मळ्यावर (काशी) राबून काबाडकष्ट करणारे आई-वडील हे चित्र घरोघरी होते. अशा परिस्थितीत आपले मूल शिकले पाहिजे, ही दुर्दम्य इच्छाशक्ती प्रत्येक आई-वडिलांची होती. तशीच इच्छा महेंद्र घरत यांचे आई-वडील (यमुनाबाई-तुकाराम) यांचीही होती. गव्हाण-कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातच महेंद्र घरत यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यावेळी त्यांना शिकविण्यासाठी असलेले शिक्षक लोखंडे बाई, लोखंडे सर, गोरड, धांडे असे असंख्य शिक्षक होते. आत ते शिक्षक सातारा जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी वाठार, लोणंद परिसरात राहतात. दरवर्षी एकदा तरी या शिक्षकांची महेंद्र घरत आवर्जून भेट घेतात. त्यांना गरजेनुसार मदत करतात. नुकतेच लोखंडे बाई यांचे निधन झाल्याचे समजल्याने सांत्वन करण्यासाठी रविवारी (ता. ५) कामगार नेते महेंद्र घरत यांनी या शिक्षकांची भेट घेतली. वयाने थकलेले, साधारण ७५ ते ८० च्या घरात असलेले हे शिक्षक आपला विद्यार्थी नवी मुंबईतून भेटायला आलाय म्हटल्यावर या शिक्षकांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांनी हास्याची जागा घेतली, आपले दुःख विसरून हे सर्व शिक्षक मन मोकळे करून त्यावेळची परिस्थिती कथन करून जुन्या आठवणींना उजाला देत होते. आजही शिक्षकांशी ऋणानुबंध जपणारे महेंद्र घरत हे एक अवलिया आहेत. तत्कालीन शिक्षकांचे आशीर्वाद घेऊन, त्यांची आजची परिस्थिती काय आहे, याची इत्थंभूत माहिती महेंद्र घरत यांनी घेतली. शिक्षकांशी संवाद साधताना महेंद्र घरत म्हणाले, तुम्ही सांगाल तिथे तुम्हाला फिरायला नेतो, तुमची जी इच्छा असेल ती मी पूर्ण करतो, तुम्ही कधीही माझ्या घरी य़ा, तुमचे स्वागत आहे, तुम्हाला कुठला प्राॅब्लेम असल्यास मला अर्ध्या रात्री फोन करा, मी तुमच्यासाठी हजर आहे, कुठलेही टेन्शन घेऊ नका, मी भक्कमपणे आपल्या मागे आहे, तब्बेतीची काळजी घ्या.“ मी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरत असलो तरी ती ताकद, क्षमता, निर्भीडपणा, वक्तृत्व मला आपल्यासारख्या शिक्षकांनी घडविल्यामुळेच लाभले, याची मला जाण आहे. अशी कृतार्थपणाची भावना व्यक्त करून महेंद्र घरत यांनी शिक्षकांचा निरोप घेतला. दरम्यान, पनवेलमध्ये ४० वर्षे आरोग्य सेवा देणारे डाॅ. राजपूत यांच्याही कुटुंबीयांची त्यांनी पुणे परिसरात भेट घेतली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. सतत कामानिमित्त धावपळीत असतानाही साधारण १२ तासांपेक्षा जास्त प्रवास करून आपल्या लाडक्या शिक्षकांचे आशीर्वाद घेणारे महेंद्र घरत हे एक अजब रसायन आहे,माणूस` हाच त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे, हे ते आपल्या कृतीतून सिद्ध करतात…..

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!