पनवेल दि.९: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट दिली. रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी शाळेला भेट देत तेथील शैक्षणिक सुविधांची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याची माहिती घेत त्यांनी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.तसेच वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्याबदल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सत्कार त्यांनी केला.
या भेटीदरम्यान आमदार प्रशांत ठाकूर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संचालक तथा नगरसेवक परेश ठाकूर, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, आधुनिक शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविणे, या विषयांवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत होत असलेले बदल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा आणि शाळांच्या माध्यमातून सक्षम, सुसंस्कृत व गुणवंत पिढी घडविण्याचे महत्त्व यावरही चर्चा झाली.

शिक्षण क्षेत्रातील योगदानाची घेतली दखल
शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास, सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि जीवनमूल्यांची रुजवण करणारे असावे, या विचारातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था सातत्याने कार्यरत आहे. शैक्षणिक क्षेत्रात संस्थेने उभारलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्थात्मक कार्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांतील विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या ध्येयधोरणातून संस्थेच्या शैक्षणिक कार्याला दिशा मिळाली आहे. याच कार्याची माहिती घेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची पाहणी केली आणि शाळेतील शैक्षणिक सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती घेतली.
याप्रसांगी नगरसेवक प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, मधु पाटील, नरेश ठाकूर, अनिता पाटील, परेश पटेल, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, संस्थेचे संचालक संजय भगत, राहुल घरत, स्वप्निल ठाकूर, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133