पनवेल दि.03 : पनवेल महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मुख्यालयातील बैठक दालनात झालेल्या कार्यक्रमामध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्यालयात झालेल्या या छोटेखानी निरोप समारंभात आयुक्त श्री. चितळे यांनी डॉ. रसाळ यांची कार्यपद्धती व सर्व विषयांचे सखोल ज्ञान याचा पनवेल महानगरपालिकेला निश्चितच मोठा फायदा झाला असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या पुढील कारकीर्दी साठी शुभेच्छा दिल्या.
तर कितीही ताण-तणावाच्या परिस्थितीत मनाची शांतता न ढळू देता उत्तम काम करण्याची हातोटी, तसेच गड भ्रमण हा आपला छंद अविरतपणे जोपासण्याची वृत्ती याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी डॉ.रसाळ यांच्या कामाची प्रशंसा केली.
डॉ. रसाळ पनवेल महानगरपालिकेत बराच काळ काम करण्याची संधी मिळाली याबद्दल डॉ. रसाळ यांनी आनंद व्यक्त करून पुढील काळातही पनवेल महानगरपालिकेच्या विकासात योगदान देऊ अशी ग्वाही दिली. व सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सर्वश्री कैलास गावडे, डॉ.वैभव विधाते, रविकिरण घोडके, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक नगररचनाकार केशव शिंदे, मुख्य शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त सर्वश्री स्वरूप खारगे, सुबोध ठाणेकर, श्रीराम पवार, श्रीमती स्मिता काळे, डॉ.रूपाली माने, लेखाधिकारी संग्राम ऱ्होरकाटे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.