पनवेल दि.३: थोर क्रांतिकारक साहित्यिक स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारवंत साने गुरुजी यांची 24 डिसेंबर रोजी शतकोत्तर रोप्यमहोत्सव जयंती वर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा. कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .
परेल मुंबई येथील एम डी कॉलेज च्या सभागृभात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा. खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर सर उपस्तिथ होते. सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती (महाराष्ट्र राज्य),च्या वतीने विशेष उल्लेखनिय कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमांमध्ये साने गुरुजी यांच्या भारतीय संस्कृती बाबतचा विचारांची उजळणी करण्यात आली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.