पनवेल दि.१२: सुरेल स्वरांची जादू, संगीताचा नाद आणि मनोरंजनाची अविस्मरणीय मेजवानी अशा उत्साही वातावरणात कळंबोलीकरांची यंदाची दिवाळी अधिकच संस्मरणीय ठरली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय जनता पक्ष, कळंबोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी संध्या’ या लोकप्रिय सांस्कृतिक कार्यक्रमाचे तिसरे वर्ष मोठ्या दिमाखात पार पडले. प्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि लोकप्रिय गायिका जुईली जोगळेकर यांनी आपल्या बहारदार गायनाने हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले.
रोडपाली बस डेपो येथील सेक्टर १६ मधील मैदानावर आयोजित या संगीतमय सोहळ्याला कळंबोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी एकापेक्षा एक सरस, धमाकेदार, रोमँटिक आणि सुरेल गीतांची मेजवानी सादर करत रसिकांना संगीताच्या विश्वात रमविले. प्रत्येक गाण्याला उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात दाद मिळत होती. गीत-संगीताच्या या सुरेल मैफलीने संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. हजारो संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेत दिवाळीच्या आनंदात संगीताची रंगत अनुभवली.
या दिमाखदार सोहळ्याला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही या सुरेल मैफलीचा आनंद घेत नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थायी समिती सभापती बबन मुकादम, प्रभाग समिती सभापती रवींद्र भगत, मधू पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, नगरसेवक अमर पाटील, शशिकांत शेळके, गणेश कडू, नगरसेविका सरस्वती काथारा, मोनाली ठाकूर, मोनिका महानवर, भाजप नेते अशोक मोटे, अमर ठाकूर, अभिषेक पटवर्धन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळीच्या मंगलमय पर्वात नागरिकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी देणाऱ्या या उपक्रमाने कळंबोलीच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिलीप बिष्ट, दिपेश परब आणि गौरव नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.

🔸शिवसेना पनवेल आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक आणि ढोलकीसम्राट निलेश परब यांच्या जुगलबंदीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
🛑सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या सुमधुर स्वरांची आणि सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्या बहारदार काव्यरचनांची अनोखी मेजवानी

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133