पनवेल दि.२९: आजच्या धावपळीच्या युगात.. वाढणारी वाहनांची वर्दळ… होणारी ट्रॅफिक.. आणि त्यावर नियंत्रण करण्याकरिता वाहतूक पोलीस हे नेहमीच उन्हात पावसात रस्त्यावरती आपलं कर्तव्य बजावत असतात. पण अश्या पनवेल वाहतूक कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना नवीन पनवेल येथील एच डी एफ सी चौकात निवारा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल महानगर प्रेस क्लब ने पुढाकार घेतला असून या बाबत पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
उन्हा-तान्हात, पावसात उभे राहून आपल्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ते अथक परिश्रम करत असतात. सततच्या वाहनांचा गोंगाट आणि प्रदूषणात काम केल्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकतात. इतरांप्रमाणेच त्यांनाही कुटुंब असते आणि सण-उत्सवांच्या दिवशीही ते ड्युटीवर असल्यामुळे आपल्या कुटुंबापासून दूर असतात. त्यांच्याशी सौजन्याने आणि आदराने बोलल्यास तेही नागरिकांना नक्कीच मदत करतात. काही वेळा नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे हे त्यांच्या कर्तव्याचा भाग असतो.पनवेल महानगर प्रेस क्लब नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक पोलिसांन साठी निवारा केंद्र उभारण्यासाठी पनवेल महानगर प्रेस क्लब ने पुढाकार घेतला असून लवकरच निवारा केंद्र उपलब्ध करून देऊ असे आश्वासन या वेळी पनवेल महानगर प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी प्रेस क्लबच्या माध्यमातून पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना दिले. या वेळी पनवेल महानगर प्रेस क्लबचे सदस्य व ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, सरचिटणीस राकेश पितळे, खजिनदार सचिन भोळे आणि पोलीस कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!