पनवेल दि.०१: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) तर्फे जागतिक परीषदेचे १ जून ते १२ जून २०२६ रोजी जिनिव्हा (स्विझर्लंड) येथे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये जगभरातून कंपनीचे मालक, देशाचे कामगार मंत्री, कामगार प्रतिनिधी असे ९००० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी INTUC या राष्ट्रीय संघटनेतर्फे न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांना केंद्र सरकारच्या मान्यतेने भारतीय कामगारांचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळाला आहे. त्यासाठी ते १ जून आपला वाढदिवस बाजूला ठेवून ३० मे रोजी जिनिव्हा येथे रवाना झाले. या परिषदेसाठी सन २०१८ मधे सुद्धा त्यांची निवड झाली होती. या परिषदेमधे जागतिक पातळीवर कामगारांच्या समस्यांवर चर्चा केली जाते व तसे कायदे बनविले जातात. कामगार नेते महेंद्र घरत हे कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारां प्रति करत असलेल्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांची दुसऱ्यांदा ILO च्या जागतिक परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!