ठाणे दि.१९: एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणतात. तसा योग या महिन्यात येत नाही. त्यामुळे आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट या दिवशी उगवणा-या चंद्राला ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणता येणार नाही. हा सीझनल तिस-या पौर्णिमेचा चंद्र असल्याने परदेशात काही लोक ब्ल्यूमून म्हणतात. पण आपल्या इथे तसे ऋतू नाहीत. चंद्र ब्ल्यू रंगाचाही दिसत नसतो. यापुढे ऑगस्ट 2026 मध्ये एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्याने 31 ऑगस्ट 2026 रोजी ब्ल्यू मून उगवणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्या चंद्राला ‘सुपर मून’ म्हणतात. त्यामुळे आज सुपरमून योग नाही कारण या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार नाही. पौर्णिमा आज 19 ऑगस्ट रोजी रात्री 11-55 ला संपते आणि चंद्र 21 ऑगस्ट रोजी पृथ्वीजवळ (3,60,199 किमी.) येणार आहे. तसा सुपर मून योग या वर्षी 18 सप्टेंबर 2024 आणि 17 ऑक्टोबर 2024 रोजी येणार आहे ,अशावेळी चंद्रबिंब 14 % मोठे आणि 30% जास्त प्रकाशित दिसते. असे खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!