पनवेल महानगरपालिकेत ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
पनवेल, दि. १५ : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेतर्फे आज स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पनवेल महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती संभाजी महाराज मैदान येथे आयोजित या कार्यक्रमात महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.
या कार्यक्रमास आमदार विक्रांत पाटील,आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता प्रितम म्हात्रे, स्थायी समिती सदस्य परेश ठाकूर,तसेच महापालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ वैभव विधाते, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त अभिषेक पराडकर, उपायुक्त रवीकिरण घोडके, उपायुक्त मंगला माळवे, सहायक आयुक्त डॉ.रूपाली माने, बाळाराम रातांबे, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल तसेच पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन करून मानवंदना दिली.

हुतात्मा स्मारकात उत्साहात ध्वजारोहण संपन्न
पनवेल येथील हुतात्मा स्मारक येथे ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक हिरवे गुरूजी यांचे उत्तराधिकारी प्रदीप तुळशीराम हिरवे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार,स्थायी समिती सदस्य परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम पाटील तसेच महापालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ वैभव विधाते, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त अभिषेक पराडकर, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त मंगला माळवे, सहायक आयुक्त डॉ.रूपाली माने, बाळाराम रातांबे, तहसिलदार मिनल भामरे, महापालिका अधिकारी, तहसिल अधिकारी व कर्मचारी प्रजापिता ब्रम्हकुमारीचे सदस्य, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!