ठाण्यात होत असलेल्या ट्राफिक साठी रायगड जिल्ह्यातून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांस प्रवेश बंदी
अलिबाग दि. १५ : ठाणे जिल्ह्यातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात सकाळी ४.०० (०४.०० HRS) ते सकाळी १०.०० (१०.०० HRS) व दुपारी ०२.०० (१४.०० HRS) ते रात्री ९.०० (२१.०० HRS) या कालावधीत रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्हा व शहराकडे जाणाऱ्या जड/अवजड (Multi Axel) वाहनांस दि. १६ ऑगस्ट २०२४ ते दि. ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत प्रवेशास मनाई करण्यात आल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
या कालावधीत रायगड जिल्ह्यातून येणारी जड/अवजड वाहने ठाणे शहरात येणार नाहीत, अशा वेळा निश्चित करुन जड अवजड वाहनांना प्रवेश मनाई केल्यास ठाणे शहरातील Peak hour Traffic कमी होण्यास व वाहतूक समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. रायगड जिल्ह्याचे कार्यक्षेत्रातून ठाणे जिल्ह्यात वाहतूक करणाऱ्या जड अवजड (Multi Axel) वाहनांना ठाणे जिल्ह्यात प्रवेशासाठी मनाई करणेच्या दृष्टीकोनातून व रायगड जिल्ह्यातील स्थानिक वाहतूक परिस्थिती विचारात घेऊन ठाणे लगतच्या कार्यक्षेत्रात वाहतूक नियंत्रण अधिसूचना निर्गमित केल्यास दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना दिलासा देणे शक्य होईल. त्याअनुषंगाने स्थानिक परिस्थितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विचारात घेवून अधिसूचना निर्गमित करणेबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा रस्ता सुरक्षा ठाणे विनंती केलेली आहे.त्या अनुषंगाने हे आदेश जारी करण्यात आले.
सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका, प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू राहणार नाही. असेही या मध्ये स्पष्ट केले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!