स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथे आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
अलिबाग दि.15:- भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उप वनसंरक्षक राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता, सां.बा.अलिबाग जगदीश सुखदेवे, नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांच्या हस्ते कोंकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न
नवी मुंबई: भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे जल्लोषात साजरा झाला. यावेळी कोंकण विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात सकाळी 09.05 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मंदा म्हात्रे, अपर आयुक्त कोकण विभाग विकास पानसरे, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजीव पालांडे, उपायुक्त (पुनर्वसन) अमोल यादव, उपायुक्त (रोहयो) रेवती गायकर, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, उपायुक्त (आस्थापना) मिनल कुटे,उपायुक्त (नियोजन) प्रमोद केंभवी, उपायुक्त (पुरवठा) अनिल टाकसाळे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, माजी सैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिकेत ध्वजारोहण
पनवेल: भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आज आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरीक्त आयुक्त भारत राठोड , उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, सहाय्यक संचालक रचनाकार ज्योती कवाडे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, विरोधी पक्षनेते, माजी नगरसेवक व नगरसेविका,शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण पालिका अधिकारी, सर्व विभाग प्रमुख,उपस्थित होते. यावेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल,पालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन केले तसेच ध्वजाला मानवंदना दिली. शिक्षण विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यात आले.
भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेतून देशभक्तीचा उत्सव
पनवेल: देशाचा स्वातंत्र्य दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहामध्ये साजरा झाला. यामध्ये आणखी भर टाकली ती खारघरमध्ये झालेल्या ‘भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रेने. विशेष म्हणजे हि रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी तिरंगा पदयात्रा ठरली. ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्यावतीने खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या देशभक्तीच्या उत्सवात हजारो नागरिक, विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भारत मातेचा जयजयकार आणि ढोलताशांच्या गजरात संपूर्ण आसमंत दणाणून गेला होता. खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या तिरंगा पदयात्रेला प्रारंभ झाला. ते पुढे मार्गक्रमण करत समारोप उत्सव चौकात झाले. या पदयात्रेत आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, पनवेल शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजेश्री वावेकर, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह सायकलपटू, हजारो नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्याचा सहभाग होता. एकूणच अत्यंत शिस्तबद्ध झालेल्या या तिरंगा रॅलीने संपूर्ण रायगड आणि नवी मुंबईचे लक्ष वेधून घेतले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल भाजप कार्यालयात ध्वजारोहण व ध्वजवंदन समारंभ
पनवेल: स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ध्वजारोहण व ध्वजवंदन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्या अनुषंगाने तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.