पनवेल दि.१३: श्री प्रल्हादराव झुलेलाल ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे ,पुज्य सिंधी पंचायत, पनवेल रिक्षा विद्यार्थी वाहक संस्था, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच पनवेल – नवी मुंबई पत्रकार संघ, विश्व सिंधी सेवा संगम आणि एमजीएम रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन पूज्य सिंधी पंचायत झुलेलाल मंदिर पनवेल येथे थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांच्या मदतीकरिता आयोजित करण्यात आले होते. यावेळी 100 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला.
सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते झाले.
पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य मनोज भुजबळ यांनी सदर रक्तदान शिबिराला भेट दिली.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता मनोहर सचदेव, अमोल साखरे, पांडुरंग हुमणे, किसन रौंदळ, मुरलीधर ढाके, भूषण चोनकर, संगीता साखरे, उज्वला व सचिन भिसे इत्यादींनी विशेष मेहनत घेतली.
![]()
