पनवेल दि.१४: गव्हाण, कोपर, जावळे, शिवाजीनगर, न्हावा, शेलघर, बामनडोंगरी या गावांचा गेल्या शंभर वर्षापासून रहदारीसाठी असलेल्या गव्हाणफाटा – गव्हाण मार्ग सिडकोच्या नवीन शहराच्या नियोजनामधे सिडको व्यवस्थापनाने पुसून टाकला. परंतु स्थानिक गावकऱ्यांची, प्रकल्पग्रस्त शेतकरी, नागरिकांची आस्था असेलला हा रस्ता सुरु राहावा अशी भावना होती. परंतु सिडको व्यवस्थापनाने ५ किलोमीटरचा वळसा वहाळ, उलवानोड मार्गे पर्याय सांगितला. त्यामुळे ग्रामस्थांमधे तीव्र संताप निर्माण झाला. कामगार नेते महेंद्र घरत यांच्या माध्यमातून बैठका झाल्या पण सिडको आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व्यवस्थापनाने हा रस्ता सुरु करण्यास असमर्थता दर्शवीली होती.
तदनंतर राष्ट्रीय महामार्गाला भुयार (TUNNEL) देऊन गव्हाणफाटा – गव्हाण रस्ता अबाधित ठेवण्याचे ठरले, यासाठी ७ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. सिडको व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दोन्ही व्यवस्थापन एकमेकांकडे चेंडू टोलवित होते शेवटी महेंद्र घरत यांनी आपला रुद्राअवतार दाखवताच दोन्ही व्यवस्थापनामार्फत निधी मंजूर करण्यात आला व आज २ वर्षानंतर हा मार्ग पूर्ण करण्यात आला. न्हावा – गव्हाण – बामनडोंगरी – शेलघर – कोपर – जावळे – शिवाजीनगर एसटी प्रवाशांची गेली २ वर्ष होत असलेली ससेहोलपट बंद होणार व लवकरच या मार्गावर लालपरी लवकरच धावणार तसे पत्र कामगार नेते महेंद्र घरत यांनी पनवेल आगार प्रमुख चौरे यांची भेट घेवून दिले. लवकरच सर्वेक्षण करून एसटी सुरु करण्याचे आश्वासन आगार प्रमुख यांनी यावेळी दिले.
राजकिय नेत्यांची इच्छाशक्ती असेल तर जनतेचे प्रश्न मार्गी लागतात हे खऱ्या अर्थाने महेंद्रशेठ घरत यांनी अश्यक्य ते श्यक्य करून दाखवून दिले.