खारघरमध्ये भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन
पनवेल दि.१४: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्यावतीने खारघरमध्ये ‘भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठी हि तिरंगा पदयात्रा असणार आहे.
‘विकसित भारत’ वर लक्ष केंद्रित करून आपला भारत देश ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. देशभरात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जात आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, या हेतूने सदर अभियान राबवले जात असून स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ते उत्सव चौक अशा मार्गाने या भव्य दिव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ होणार आहे. या तिरंगा पदयात्रेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून अविस्मरणीय अनुभव आणि देशभक्तीच्या उत्सवात नागिरकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!