पनवेलदि. २०: रायगड जिल्हा प्रेस क्लब च्या अंतर्गत पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबची सन २०२५ साठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पत्रकार प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर आणि रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे तसेच विजय मोकल, अनिल भोळे यांच्या उपस्थित पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब ची स्थापना करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष तृप्ती पालकर, सरचिटणीस हरेश साठे, कार्यध्यक्ष राजेंद्र पाटील आणि खजिनदार म्हणून दत्तात्रय कुलकर्णी, सल्लागार नितीन देशमुख यांची निवड करण्यात आली. त्याच बरोबर पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब चे सदस्य म्हणून जेष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम, राकेश पितळे, सुमंत नलावडे, नितीन कोळी, सचिन भोळे हे असणार आहेत. या वेळी पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी मनोगत व्यक्त करताना, पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण करू तसेच जास्तीत जास्त तळागाळातील घटकांपर्यंत पोहचून गरजवंतांना मदतीचा हात देऊ,असे सांगितले. या नियुक्तीबद्दल सर्व स्थरातून अध्यक्ष प्रशांत शेडगे यांचे अभिनंदन होत आहे.