पनवेल दि.२०: पनवेल युवा याचे संपादक तथा जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांना भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित भीम महोत्सव २०२५ या कार्यक्रमात त्याना जेष्ठ साहित्यिक, कवी लेखक बबन सरोदे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले .
पनवेल तालुक्यातील भीम महोत्सव हा गेली सात वर्षे भरवला जातो या महोत्सवात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो या वर्षी चा भीमरत्न पुरस्कार पनवेल युवा चे संपादक तथा जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांना देऊन गौरविण्यात आले, निलेश सोनावणे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीत कार्यकर्ते आहेत गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असून दलित आदिवासी, गरजू लोकांसाठी काम करीत आहेत. अनेक सामाजिक संघटनेचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. लोकशक्ती संजीवनी प्रतिष्टान महाराष्ट्र या संस्थेचे ते राष्टीय उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. विविध धार्मिक संघटनाचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे गेली सात वर्ष सलग अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भीम महोत्सव समितीने त्यांना या वर्षी भीमरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. जिल्हास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत पंचवीस ते तीस पुरस्काराने त्यांना आतापर्यंत विविध संस्थांनी त्यांना गौरविले आहे . या कार्यक्रमात समाजातील कमलाकर कांबळे, प्रकाश गायकवाड, विजय बाबरे , सुदिन पाटील, संतोष आमले यांनाही भीमरत्न उरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कला क्षेत्रातील उल्लेखनीय कला सादर करणाऱ्या
प्रशांत नाक्ती, सोनाली सोनवणे, रितेश कांबळे, बबन सरोदे, कांचन पगारे, प्रबुद्ध जाधव, अमोल घोडके, विशाल म्हस्कर, प्रशांत मोहिते, रवी जाधव यांना कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .यावेळी कलाकार दिग्दर्शक विशाल सावंत यांचा हि सत्कार करण्यात आला.