पनवेल दि.२०: रोटरी प्रांत ३१३१ मधील क्रिकेटप्रेमी सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग या स्पर्धेत बीकेसी संघाने प्लॅटिनम करंडक पटकाविला तरी बाश्री संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेचा सांगता व पारितोषिक वितरण सोहळा रविवारी कळंबोली येथील मैदानात झाला. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. दरम्यान, स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला व आयोजकांचे कौतुक केले.
या स्पर्धेत बीकेसी संघाने प्लॅटिनम करंडक पटकाविला व बाश्री संघ उपविजेता ठरला. गोल्ड करंडक हा प्राईम दादा संघाने जिंकला व उपविजेतेपद आर.आर. संघाने मिळवले, तर सिल्वर करंडक पिंपरी इलिट संघाने प्राप्त केले व रिवेल संघ उपविजेता ठरला. त्याचबरोबर स्पर्धेतील मालिकावीर प्रशांत तेलंगे, उत्कृष्ट फलंदाज दिग्विजय मोहिते, उत्कृष्ट गोलंदाज विजय कोतवाल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक योगेश वाघ, उत्कृष्ट यष्टीरक्षक महेश उरणकर, ५० वर्षावरील मालिकावीर गणेश कडू, सर्वाधिक षटकार प्रितम कैया, सर्वोत्तम झेल डॉ. आमोद दिवेकर हे ठरले. पारितोषिक वितरण समारंभास श्रेयस दिक्षित, हर्मेश तन्ना, डॉ. आमोद दिवेकर, वसंत कोकणे, प्रशांत तुपे आदी उपस्थित होते. रोटरी सदस्यांनी या स्पर्धेत आपले क्रीडा कौशल्य दाखवत क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.