राज्य सरकारतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्याच्या निर्णयानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली होती. रविवारी दिवसभर शिवसेनेच्या नेत्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्हयाच्या पालकमंत्रीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
भरत गोगावले यांना याठिकाणी पालकमंत्री पद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र गोगावले यांना डावलून पुन्हा आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात आले. त्यामुळे गोगावले यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामेही दिले. तर, दुसरीकडे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नाव नाशिकचे पालकमंत्री म्हणून घेतले जात होते. शिंदे गटातील या ज्येष्ठ मंत्र्यांना डावलून नाशिकच्या पालकमंत्रीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. यावरून शिंदे गटात मोठी नाराजी निर्माण झाली होती. 
19 जानेवारीला रात्री उशीरा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. 

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!