कळंबोली दि.१९ (दीपक घोसाळकर) मकर संक्रांति निमित्त उडवण्यात आलेल्या पतंगांचा मांजात अडकून जीवानिशी जाणाऱ्या शांतिदूतला पनवेल महापालिकेचे कळंबोली अग्निशामक दल देवदुत ठरले आहे. रविवारी सकाळी एका सजग नागरिकाने पतंगाच्या मांजात अडकून कबुतरावर उडवलेली संक्रांत पाहून त्याच्या जीवाची घालमेल झाली. त्याने त्वरित कळंबोली अग्निशामक दलाला दूरध्वनी करून सांगितले .क्षणाचाही विलंब न करता कळंबोली अग्निशामक दल प्रमुख मनीष ब्राह्मणकर यांनी आपल्या अग्निशामक दलाला सांगून मांजात अडकलेल्या अन लटकलेल्या कबुतराची सुखरूप सुटका करून त्याला जीवदान दिले आहे. कळंबोली अग्निशामक दलाने केलेल्या कामगिरीचे उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करून धन्यवाद दिले.
रोडपाली जवळील बस डेपो समोर असलेल्या झाड व विद्युत तार यामध्ये पतंगाच्या मांजात गुरफडलेल्या अन लटकलेल्या स्थितीत कबूतर आपला जीव वाचवण्यासाठी फडफड करत होते. विजेच्या तारेवर पतंगांच्या मांज्यात अडकलेल्या कबुतराची घालमेल तिथे उभे असलेल्या सतनाम सिंग या सजग नागरिकांनी पाहिली . मांज्यात अडकलेला शांतीदूत आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत असल्याने सतनाम सिंग यांनी त्वरित क्षणाचाही विलंब न करता कळंबोली अग्निशामक प्रमुख मनीष ब्राह्मणकर यांना कळवले.मनीष ब्राह्मणकर यांनी त्वरित आपले अग्निशामक दल जवान, रेस्क्यू टीम , रेस्क्यू गाडी घटनास्थळी पाठवली. यामधील प्रमुख अग्निशमन विमोचक ओंकार पाटील यांनी यशस्वीरित्या विजेच्या तारेवर मांजामध्ये अडकलेल्या कबुतराला सुखरूपपणे रेक्सु करून खाली आणले. यावेळी यंत्र चालक सुरज कडु, नारायण गर्जे, अग्निशामक जवान परेश दुधे, योगेश जाधव, मनिष काकडे यांनी मोलाची कामगिरी बजावली. शांतिदूत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कबुतराला पनवेल महापालिकेच्या कळंबोली येथील अग्निशामक दलाने जीवनदान दिल्याने रेस्क्यू चे थरारक नाट्य पाण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांनी टाळ्यांचा गजर करून कळंबोली अग्निशामक दलाचे अभिनंदन करून धन्यवाद दिले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!